
Maha Kumbh 2025 Monalisa: प्रयागराज महाकुंभ २०२५ चे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्धी घाऱ्या डोळ्यांच्या मोनालिसाला मिळाली होती. विशेष म्हणजे या प्रसिद्धीला घाबरून अचानक तिच्या गावी निघून गेल्यानंतर आता मोनालिसाला एका चित्रपट दिग्दर्शकाने चित्रपटाची ऑफर दिली आहे. दरम्यान, मोनालिसाचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून चाहते थक्क झाले आहेत.
या व्हिडीओने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. महाकुंभमेळ्यातून इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या मोनालिसाने व्हिडीओमध्ये तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. आपल्या साधेपणाने सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी मोनालिसा व्हिडीओमध्ये खूपच बदललेल्या शैलीत दिसत आहे, ज्याला पाहून नेटिझन्स 'बॉलिवूड हिरोइन्सना अडचणीत येणार आहेत...' असे म्हणत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये, मोनालिसा नदीच्या काठावर लाल रंगाच्या बॉडीकॉन शॉर्ट ड्रेसमध्ये नाचताना दिसत आहे.
मोनालिसाचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मोनालिसाची बोल्ड स्टाईल पाहून युजर्सही आश्चर्यचकित झाले आहेत. खरंतर, मोनालिसाचा हा व्हिडीओ बनावट आहे, जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया इन्फ्लुएंसर तन्नू रावतचा आहे. यामध्ये एआयच्या मदतीने मोनालिसाचा चेहरा तन्नूच्या चेहऱ्यावर लावण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर असे दिसते की मोनालिसा स्वतःच नाचत आहे. दरम्यान हा व्हिडीओ खरा नसून हा एक बनावट व्हिडीओ आहे.
आश्चर्यचकित झालेले नेटिझन्स मजेदार कमेंट्स करत आहेत
व्हिडीओमध्ये मोनालिसा आशा भोसले यांच्या 'शरारा-शरारा' गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडीओवर युजर्स त्यांच्या मजेदार प्रतिक्रियाही देत आहेत. एका नेटिझन्सने कमेंट केली, 'हे काय आहे, मोनालिसाचा लूक बदलला'. दुसऱ्याने लिहिले, 'हा स्टारडमचा परिणाम आहे.' तिसऱ्या नेटिझन्सने लिहिले, 'एआयचा गैरवापर होत आहे'. चौथ्या वापरकर्त्याने लिहिले, 'हा चित्रपट मिळाल्याचा परिणाम आहे, मोनालिसा खूप बदलली आहे'. दरम्यान, हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी फेस स्वॅप तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.