Amitabh Bachchan: 'महाकुंभ स्नान भव:…'; अमिताभ बच्चन यांची पोस्ट, चाहते बिग बींच्या प्रकृतीबद्दल चिंतेत

Amitabh Bachchan Post: प्रयागराजमधील संगम शहरात महाकुंभमेळा सुरू झाला आहे. अमिताभ बच्चन यांनीही महाकुंभमेळ्या संदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे, त्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी बिग बींची काळजी वाटत आहे.
Amitabh in maha kumbha mela
Amitabh in maha kumbha melaSaam Tv
Published On

Amitabh Bachchan: प्रयागराजमधील संगम शहरात महाकुंभमेळा सुरू झाला आहे. केवळ देशातील नाही तर जगभरातील लोक या कुंभमेळ्यात सहभागी झाले आहेत. उत्तर भारतात कडक हिवाळा असूनही, महाकुंभासाठी लोकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटी आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन देखील या मेगा फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊ शकतात असे वृत्त आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी एक्स वर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या व्हायरल होत आहे.

“महाकुंभ स्नान भव:,” असे अमिताभ बच्चन यांनी आज सकाळी X वर लिहिले. यानंतर, बिग बींच्या पोस्टवर कमेंट करणाऱ्या नेटकऱ्यांचा ओघ सुरू झाला. थंडीमुळे लोकांना अमिताभच्या तब्येतीबद्दल काळजी वाटू लागली. चाहत्यांनी त्यांना सल्ला दिला की खूप थंडी आहे आणि त्यांनी काळजी घ्यावी, अन्यथा बिग बी आजारी पडू शकतात.

Amitabh in maha kumbha mela
Kangana Ranaut: 'इमर्जन्सी'च्या रिलीजपूर्वी कंगना राणौतला मोठा धक्का! शेजारच्या देशात चित्रपटावर घातली बंदी

अमिताभच्या पोस्टवर लोकांच्या कमेंट्स

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर एका युजरने विचारले, "साहेब, तुम्ही आंघोळ केली का?" तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले “हर हर महादेव, जय सत्य सनातन धर्म. साहेब, स्वतःची काळजी घ्या दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “श्रद्धेच्या महाकुंभातील पवित्र स्नानासाठी बच्चनजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.” याशिवाय अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.

Amitabh in maha kumbha mela
Pushpa 3: पुष्पाच्या तिसऱ्या भागात काय घडणार?; सुकुमार यांचं नाव घेत संगीतकार डीएसपी यांनी स्टोरीबाबत सगळंच सांगितलं!

थंडी असूनही महाकुंभातील भाविकांचा उत्साह कमी होत नाही

महाकुंभाबद्दल बोलायचे झाले तर, कडाक्याची थंडी असूनही, कुंभमेळ्याच्या तिसरा दिवशी भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे. महाकुंभात स्नान करण्यासाठी भाविक त्रिवेणी संगमावर पूर्ण उत्साहाने जमत आहेत. या खास प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टप्प्यावर कडक देखरेख ठेवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com