Saroj Khan Biopic: सरोज खान यांच्या बायोपिकमध्ये दिसणार माधुरी दीक्षित? चित्रपटाच्या निर्मितीबाबत मुलगी सुकैनाचा मोठा खुलासा

Madhuri Dixit Movie: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित दिवगंत कोरिओग्राफर सरोज खान यांची भूमिका साकारणार आहे.
Saroj Khan And Madhuri Dixit
Saroj Khan And Madhuri DixitSaam TV

Madhuri Dixit Playing Saroj Khan In Movie:

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित दिवगंत कोरिओग्राफर सरोज खान यांची भूमिका साकारणार आहे. सरोज खान यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार करत आहेत. तर हंसल मेहता यांच्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देण्यात आली आहे. सरोज खान यांच्या मुलीने चित्रपटाच्या कास्टिंगवर भाष्य केले आहे.

Saroj Khan And Madhuri Dixit
Madhuri Pawar Post: 'लंडन मिसळ'मध्ये माधुरी पवारचा तडका; चित्रपटाचा BTS व्हिडीओ व्हायरल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरोज खान यांच्या बायोपिकमध्ये कोणती अभिनेत्री काम करणार हे अद्याप फायनल झालेले नाही. मेकर्स माधुरी दीक्षितला कास्ट करू इच्छित नाहीत. निर्माते सरोज खान यांच्या जीवनातील वेगवगेळे टप्पे दाखविण्यासाठी वेगवेगळ्या अभिनेत्रींच्या शोधत आहेत.

अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार, सरोज खान यांचा बायोपिक लेखनाला सुरूवात झाली आहे. निर्मात्यांच्या मते या बायोपिकमध्ये कव्हर करण्यासारखे खूप काही आहे. सरोज खान यांनी त्यांच्या जीवनात खूप संघर्ष केला आहे. बायोपिकच्या माध्यमातून त्याचे जीवन मोठ्या पडद्यावर दाखविण्याचा प्रयत्न निर्माते करत आहेत. त्यामुळे चित्रपट कोणत्या दृष्टिकोनातून दाखवायचा असा प्रश्न निर्मात्यांसमोर आहे.

सरोज खान यांची मुलगी सुकैनाला देखील मीडियाने या बायोपिकविषयी विचारले. तेव्हा ती म्हणाली की, 'अद्याप चित्रपटाचे कोणतेही नाव फायनल झालेले नाही. चित्रपटाविषयी काही ठरलेले नाही. चित्रपटाच्या टीमने मला सांगितले की ते जेव्हा अभिनेत्रीची निवड केली होआल तेव्हा ते आमच्या कुटुंबाला सांगतील. योग्य अभिनेत्रीला कास्ट करणं कठीण काम आहे. मला वाटत नाही आतापर्यंत काही फायनल झालं असेल.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com