Madhuri Pawar Post: 'लंडन मिसळ'मध्ये माधुरी पवारचा तडका; चित्रपटाचा BTS व्हिडीओ व्हायरल

Landon Misal Song: माधुरी पवारने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 'लंडन मिसळ' गाणे वाजत आहे.
BTS Video From Movie Landon Misal
BTS Video From Movie Landon MisalSaam TV

Madhuri Pawar Share Dance Video:

गौरव मोरे काही दिवसांपूर्वी लंडनला गेला होता. गौरव इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून प्रेक्षकांना लंडनची सफर देखील घडवत होता. काही दिवसांपूर्वी गौरवच्या लंडनला जाण्यामागचं कारण समोर आलं. गौरव मोरे 'लंडन मिसळ' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिथे गेला होता.

या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. या चित्रपटातील BTS व्हिडीओ देखील सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अभिनेत्री माधुरी पवार हिने शेअर केला आहे. या व्हिडीओतून चित्रपटाची कास्ट देखील रिव्हील झाली आहे.

BTS Video From Movie Landon Misal
Kushal Badrike Post: राग-रतन गाण्याचा रियाज करणाऱ्या कुशलला भाऊतूल्ला खाँ साहेबांनी आणले भानावर

अभिनेत्री माधुरी पवारने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये या चित्रपटातील सर्व कलाकार दिसत आहेत. व्हिडीओमध्ये 'लंडन मिसळ' असे गाणे वाजत आहे. तर चित्रपटातील कलाकार यावर डान्स प्रॅक्टिस करताना दिसत आहेत.

माधुरी पवारने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये गौरव मोरे, माधुरी पवार, ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, वैशाली सामंत आणि आपला लाडका अभिनेता भरत जाधव दिसत आहेत. माधुरी पवार या चित्रपट असल्याने 'लंडन मिसळ' चित्रपटामध्ये भन्नाट डान्स किंवा अप्रतिम लावणी प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल असं म्हणायला हरकत नाही.

गौरव मोरे आणि भरत जाधव एकत्र दिसणार म्हणजे विनोदाची डबल धम्माल पाहायला मिळणार. लंडनमध्ये शूट झालेला हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आहे. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com