Famous Actress : 'मांडीवर बसवलं, ओठांवर Kiss केलं अन्...'; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत मामाचं भयानक कृत्य, ढसाढसा रडत मांडली व्यथा | VIDEO

Actress Molestation By Uncle : टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वतःसोबत घडलेला वाईट प्रसंग सांगितला आहे. तिच्या मामानेच तिच्यासोबत अश्लील वर्तन केले होते. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
Actress Molestation By Uncle
Famous ActressSAAM TV
Published On
Summary

रिॲलिटी शोमध्ये अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग

मामाने अभिनेत्रीचा छळ केला

ढसाढसा रडत अभिनेत्रीने मांडली व्यथा

सध्या 'लॉकअप 2' हा शो चांगलाच चर्चेत आहे. लॉकअपमधील सदस्य कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. अशात टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशीने शोमध्ये एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्वांनाच अश्रू अनावर झाले.शिवांगीने आपल्या आयुष्यातील मोठे रहस्य सर्वांना सांगितले आहे.

शिवांगी जोशीने 'लॉकअप 2'च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात बालपणीचे दोन धक्कादायक प्रसंग सांगितले आहेत. शिवांगीने सांगितले की तिच्या वडिलांना मोठे नुकसान झाले, ज्यामुळे त्यांना त्यांच्या मालकीची प्रत्येक गोष्टी विकाव्या लागल्या. ते जवळजवळ रस्त्यावर आले होते. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी कसाबसा गुजारा करत घर चालवले. आता, शिवांगी एकटीच घर सांभाळते. त्यानंतर तिने तिच्या बालपणीची एक वेदनादायक गोष्ट सांगितली, ज्यात तिचा लैंगिक छळ झाला होता.

शिवांगी जोशीने सांगितले की, "मी लहान असताना माझाही लैंगिक छळ झाला होता. माझ्या आईला एक भाऊ होता, आम्ही त्यांना मामाजी म्हणायचो आणि ते एक खूप प्रतिष्ठित व्यक्ती होते. ही घटना तेव्हा घडली जेव्हा मला अभिनयात करिअर करण्यासाठी मुंबईला यायचे होते. त्याने याचा पुरेपूर फायदा घेतला. तो म्हणायचा, 'जर तू मुंबईला जाणार असशील, तर तुला खोट्या अभिनयाच्या कौशल्याने गाडी चालवता आली पाहिजे.' तो मला त्याच्या मांडीवर बसवून म्हणायचा, 'स्टिअरिंग व्हील धर आणि खोट्या गाडीसारखी गाडी चालव. तू शिकशील.' मी बसायचे, आणि काही वेळाने मला हे आवडेनासे झाले.मी त्याला सांगितले, 'मला गाडी चालवायला शिकायचे नाही.'"

Actress Molestation By Uncle
Batwara 1947 Trailer : फाळणीचा थरार, दुःखाच्या वेदना; सनी देओलच्या 'बंटवारा १९४७'चा ट्रेलर पाहून सुन्न व्हाल | VIDEO

शिवांगी पुढे सांगते की, "एक दिवस, जेव्हा मुंबईची माझी तिकीटं बुक झाली, तेव्हा माझे आई-वडील घरी नव्हते. तो मला समजावून सांगू लागला, 'बाळ, तू तिथे जात आहेस, तिथे अशा गोष्टी घडतात. अभिनय करताना तुला या सगळ्याला सामोरे जावे लागेल.'" शिवांगीने खुलासा केला की, तिच्या मामाने अभिनयाच्या नावाखाली तिला किस घेण्याचा प्रयत्न केला. तिने याला कंटाळून त्याच्या चेहऱ्यावर मारले, ज्यामुळे तो संतापला आणि त्याने तिला इजा करण्याचा प्रयत्न केला. यानंतर, तिचे आई-वडील घरात आले आणि मामाला मारहाण केली."

शिवांगी जोशी टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे. तिने 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'बरसात' आणि 'बडे अच्छे लगते हैं २' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com