Gautami Patil Song: गौतमीची अदा पाहून निक झालाय फिदा, 'सुंदरा' मधील नृत्याने जिंकली मने

Gautami Patil New Song Released: रोमॅंटिक गाणं “सुंदरा”. नुकतच हे गाणं प्रदर्शित झाल आहे. विशेष म्हणजे या गाण्यात नृत्यांगणा गौतमी पाटील अदाकारी पाहायला मिळते आहे.
Entertainment News
Gautami Patil SongSaam Tv
Published On

गौतमी पाटीलच्या कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर साईरत्न एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक रोमॅंटिक गाणं “सुंदरा”. नुकतच हे गाणं प्रदर्शित झाल आहे. विशेष म्हणजे या गाण्यात नृत्यांगणा गौतमी पाटील सोबत अभिनेता निक शिंदे झळकला आहे. तसेच गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांनी या गाण्याला स्वरसाज दिला आहे. वैभव देशमुख यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत दिलं आहे. रोहित नागभिडे यांनी टिंग्या, लालबागची राणी,लूज़ कंट्रोल, ख्वाडा, टीडीएम, लगन अश्या अनेक चित्रपटांना आजवर संगीत दिले आहे. संगीत नियोजन सिद्धांत बोरावके याने केले आहे.

Entertainment News
Sayali Sanjeev : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी!! डोईवर विठुमाऊली घेऊन मराठमोळी अभिनेत्री पंढरीच्या वारीत, पाहा VIDEO

गौतमी पाटील सुंदरा गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, “कृष्ण मुरारी या गाण्याच्या यशानंतर माझं सुंदरा हे गाणं प्रदर्शित झालं आहे. मी साईरत्न एंटरटेनमेंटचे आभार मानते की त्यांनी मला कृष्ण मुरारी या गाण्यानंतर सुंदरा या गाण्यात पुन्हा संधी दिली. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की जस तुम्ही कृष्ण मुरारी या गाण्याला भरभरून प्रेम दिल तसच प्रेम सुंदरा या गाण्याला द्या. सुंदरा या गाण्याला सुंदर रील व्हिडिओ बनवा. आणि मला जरूर टॅग करा.”

गायिका सोनाली सोनवणे गाण्याच्या रेकॉर्डिंग विषयी सांगते, “गाण्याचं नावच सुंदरा आहे. त्यामुळे तुम्हाला कळालचं असेल गाणं किती सुंदर असेल. खरच गाणं खूप सुंदर झालं आहे. मला गाताना खूप मज्जा आली. मला खात्री आहे की तुम्हालाही हे गाणं खूप आवडेल. तुम्ही थिरकणार आहात या गाण्यावर. मी आणि रोहित राऊतने हे गाणं गायलं आहे. या गाण्याचं संगीत रोहित नागभिडे यांनी केलं असून वैभव देशमुख यांनी हे गाणं लिहील आहे. तुम्हाला हे गाण कस वाटल हे आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा.”

Entertainment News
Sardaar Ji 3: दिलजीत देशद्रोही...; 'सरदारजी 3'मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरची एन्ट्री, नेटकऱ्यांचा संताप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com