Sayali Sanjeev : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी!! डोईवर विठुमाऊली घेऊन मराठमोळी अभिनेत्री पंढरीच्या वारीत, पाहा VIDEO

Sayali Sanjeev Video : मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव वारीमध्ये सहभागी झाली आहे. तिने सोशल मीडियावर याचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.
Sayali Sanjeev Video
Sayali SanjeevSAAM TV
Published On

आषाढी एकादशी यंदा 6 जुलैला आली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र वारीचे वातावरण पाहायला मिळत आहे. लाखो भाविक या वारकरीत सहभागी होतात. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन पंढरपूरला जातात. सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळी या सोहळ्यात सहभागी होतात. असाच एक अद्भुत अनुभव मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) देखील घेतला आहे. सायली संजीव वारीमध्ये सहभागी झाली आहे.

सायली संजीवने नुकतेच वारीतील सुंदर क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सायली संजीव संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्यात झाली होती. याचे तिने दोन सुंदर व्हिडीओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये सायली वारकऱ्यांसोबत सुंदर फुगडी घालताना दिसत आहे. तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा...राम कृष्ण हरी माऊली..."

सायली संजीवने शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती डोक्यावर विठुमाऊलीची मूर्ती घेऊन वारीत चालताना दिसत आहे. तसेच तिने कपाळावर टिळा देखील लावला आहे. या व्हिडीओला सायलीने खूप खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "तुझ्या श्रद्धेची सावली माथा टेकीन माऊली..." सध्या सायली संजीवच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सायली संजीवचा लूक

सायली संजीव वारीत पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळाली. तिने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. केसांची वेणी, मिनिमल मेकअप आणि ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला होता.

सायली संजीव वर्कफ्रंट

सायली संजीवने आजवर अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'काहे दिया परदेस' या मालिकेमुळे सायली प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Sayali Sanjeev Video
Vijay Devarakonda : विजय देवरकोंडा विरोधात FIR दाखल; आदिवासी समुदायावर वादग्रस्त वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com