Super Duper Marathi Movie: मराठी प्रेक्षकांना कौटुंबिक विषयांवरील चित्रपट नेहमीच आपलेसे वाटतात. कुटुंबातील नातेसंबंध, सुख-दुःख, भावनिक गुंफण आणि आपुलकी या सगळ्यांशी प्रेक्षक सहज जोडले जातात. हाच भाव लक्षात घेऊन झी स्टुडिओज मराठी प्रेक्षकांसाठी एक नवा, हसरा आणि भावनिक चित्रपट घेऊन येत आहे. ‘सुपर डुपर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्सने केली आहे. समीर आशा पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘सुपर डुपर’ हा चित्रपट नावाप्रमाणेच मनोरंजनाने भरलेला असून, कुटुंबातील विविध भावनांची रंगतदार मांडणी करणार आहे. ‘कौटुंबिक महासोहळा’ ही टॅगलाईन असलेला हा चित्रपट येत्या ३ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टीझरमधून चित्रपटातील भक्कम स्टारकास्टची झलक पाहायला मिळते. निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले ही मुख्य जोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. कलाकारांची केमिस्ट्री, हलकाफुलका विनोद आणि भावनिक क्षण यांचा सुरेख मेळ टीझरमध्ये दिसतो.
चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक समीर आशा पाटील सांगतात की, “हा चित्रपट कुटुंबासाठी आणि कुटुंबावर आधारित आहे. माणसाच्या आयुष्यात कुटुंबाची भूमिका फार महत्त्वाची असते. त्या नात्यांमधून येणाऱ्या भावना, अनुभव आणि आठवणी आम्ही या चित्रपटातून मांडणार आहोत. लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच हा सिनेमा आपलासा वाटेल.”
झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांच्या मते, मराठी प्रेक्षकांना नात्यांची गोष्ट नेहमीच भावते. ‘सुपर डुपर’मधून एका कुटुंबाची वेगळ्या ढंगाची, मनोरंजनाने भरलेली कथा मांडली असून, हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते असलेल्या या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर आहेत. आता टीझरनंतर ‘सुपर डुपर’साठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.