Kim Kardashian Lookalike Christina Ashten Gourkani Died: हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री किम कर्दाशियन कॉपी समजली जाणारी कॅलिफोर्नियाची मॉडेल क्रिस्टीना अॅश्टनचा मृत्यू झाला आहे. अवघ्या ३४ व्या अभिनेत्रीचे निधन झाले आहे. हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियनसारखी दिसण्यासाठी क्रिस्टीना अॅश्टनने प्लास्टिक सर्जरी केली, त्यानंतर तिला किमसारखा चेहरा आणि फिगर मिळाली.
क्रिस्टनचे वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. क्रिस्टीनाच्या कुटुंबीयांनी 26 एप्रिल रोजी सोशल मीडियावर तिच्या मृत्यूची बातमी दिली होती. या दु:खद बातमीमुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मॉडेल क्रिस्टीना अॅश्टनने अनेक प्लास्टिक सर्जरी करून किमसारखा चेहरा आणि फिगर केली होती. शस्त्रक्रियेनंतर ती हुबेहुब किमसारखी दिसायला लागली. यामुळे तिच्या फॅन फॉलोइंगमध्येही वाढ झाली होती. 34 वर्षीय मॉडेलचे इंस्टाग्रामवर 6,26,000 पेक्षा जास्त चाहते आहेत. 20 एप्रिल रोजी ही दुःखद घटना घडल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
ही दुःखद माहिती शेअर करताना मॉडेल क्रिस्टीना अॅश्टनच्या कुटुंबाने सांगितले की, '२० एप्रिल २०२३ रोजी पहाटे ४:३१ वाजता आमच्या कुटुंबाला एक दुःखद फोन आला.एका फोन कॉलने आमचे जग एका क्षणात उध्वस्त झाले. त्याचे म्हणणे आहे की, वैद्यकीय प्रक्रिया बिघडल्यामुळे 'मॉडेलला हृदयविकाराचा झटका आला'. (Latest Entertainment News)
क्रिस्टीनाच्या कुटुंबाचा असा दावा आहे की तिच्या आकस्मिक मृत्यूची चौकशी सध्या 'वैद्यकीय प्रक्रियेशी संबंधित एक हत्या' म्हणून केली जात आहे. तिची शस्त्रक्रिया अयशस्वी झाली होती. मेयो क्लिनिकच्या मते, हृदयातील विद्युत प्रणालीत समस्ये निर्माण झाल्यामुळे हृदय अचानक धडधडणे थांबते तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो.
ओन्लीफॅन्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती खूप लोकप्रिय होती. याआधी कॅनेडियन अभिनेता सँड वॉनने बीटीएस गायक जिमीनसारखे दिसण्यासाठी 12 कॉस्मेटिक सर्जरी केल्या होत्या, यामध्ये जबड्याची शस्त्रक्रिया, इम्प्लांट, फेस लिफ्ट, नाकाची सर्जरी, आय लिफ्ट, आयब्रो लिफ्ट, ओठ कमी करणे आणि इतर अनेक शस्त्रक्रिया केल्या होत्या. त्यांचाही काही काळापूर्वी मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.