'Ponniyin Selvan 2' Review: सलमानच्या सिनेमासमोर दाक्षिणात्य चित्रपटाने पुन्हा मारली बाजी; 'पोन्नियन सेल्वन 2' प्रेक्षकांची पसंती

'Ponniyin Selvan 2' Twitter Review: PS 2 या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.
'Ponniyin Selvan 2' reviewed
'Ponniyin Selvan 2' reviewedInstagram @aishwaryaraibachchan_arb

Netizens Appreciating Aishwarya Rai Bachchan In PS2: दिग्दर्शक मणिरत्नम यांचा पोन्नियन सेल्वन 2 हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा पहिला भाग नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याचे जगभरात कौतुक झाले होते.

पोनियिन सेल्वनच्या यशानंतर प्रेक्षक PS 2 ची आतुरतेने वाट पाहत होते. चोल साम्राज्यावर आधारित हा चित्रपट अखेर चित्रपटगृहात दाखल झाला आहे. PS 2 या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.

पोन्नियिन सेल्वन 2 ची सर्वात खास गोष्ट म्हणजे ऐश्वर्या राय. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत चियान विक्रम, जयम रवी आणि तृषा कृष्णन यांसारखे साऊथ सुपरस्टार आहेत. असे असाल तरी ऐश्वर्याची चर्चा होत आहे. (Latest Entertainment News)

'Ponniyin Selvan 2' reviewed
The Kerala Story Trailer: ३२ हजार मुलींची हृदयद्रावक कथा सांगणार 'द केरला स्टोरी'... काळीज पिळवटून टाकणारा ट्रेलर पाहिलात का?

काही प्रेक्षकांनी चित्रपट पाहिल्यानंतर पोनियिन सेल्वन 2 आणि ऐश्वर्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा अशी मागणी केली. चला जाणून घेऊया या चित्रपटाविषयी काय आहे नेटकऱ्यांचे मत.

चित्रपटाचे पुनरावलोकन करणार्‍या एका नेटकाऱ्याने सांगितले की, "हा देशाचा खरा अभिमान आहे. टॉलीवूड चाहत्यांनो माफ करा. ओव्हररेट केलेल्या बाहुबली 2 पेक्षा पोनियिन सेल्वन खूपच चांगला आहे."

दुसर्‍या नेटकाऱ्याने ट्विट केले आहे, "पोन्नियिन सेल्वन विषयी एका शब्दात सांगायचे तर, विजेता. मणिरत्नमने एक अप्रतिम सिक्वेल बनवला आहे. चियान विक्रम हे मुख्य आकर्षण आहे. फेस ऑफ सीन सुंदर आहे. सर्वच कलाकारांनी उत्तम काम केले आहे. संगीत, सिनेमॅटोग्राफी आणि कला." चित्रपट अप्रतिम आहे. एकूणच पोन्नियिन सेल्वन 2 हा एक चांगला पिरियॉडिक ड्रामा आहे."

ऐश्वर्या रायचे कौतुक करताना एका नेटकाऱ्याने लिहिले की, "चित्रपटातील सर्वोत्कृष्ट पात्र नंदनीचे आहे. ऐशसारखे दुसरे कोणीही ते साकारू शकत नाही. माझ्या बाजूने ऐश्वर्या राय बच्चनला तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळावा. "नंदिनीचे डोळे कोणत्याही आकर्षित करतील असे आहेत."

चित्रपट स्लो असल्याचे वर्णन करताना, एका नेटकाऱ्याने सांगितले की, "विक्रम आणि ऐश्वर्याने शो स्टील केला आहे. तृषा, जयम रवी आणि कार्ती ब्रिलियंट आहेत. व्हिज्युअल आणि आर्ट जबरदस्त आहे. BGM निराशाजनक आहे. चित्रपट स्लो आहे, पण स्टोरी चांगली प्रेसेंट केली आहे. शेवट खूप आवडला."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com