The Kerala Story Trailer: ३२ हजार मुलींची हृदयद्रावक कथा सांगणार 'द केरला स्टोरी'... काळीज पिळवटून टाकणारा ट्रेलर पाहिलात का?

The Kerala Story Trailer Out: 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचा चित्तथराक ट्रेलर रिलीज झाला आहे.
The Kerala Story Trailer
The Kerala Story TrailerInstagram @sunshinepicturesofficial
Published On

The Kerala Story Trailer Out On OTT: 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचा चित्तथराक ट्रेलर रिलीज झाला आहे. ही कथा आहे केरळ मधील मुलींची आहे. या मुलींना नर्स व्हायचं होतं, पण ISIS जाळ्यात अडकल्या आणि दहशतवादी झाल्या. या मुलींचे धर्म परिवर्तन करण्यात आले. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून मुस्लिम बनवण्यात आले.

5 मे 2023 रोजी रिलीज होणारा या चित्रपटाची सुदीप्तो सेन यांनी निर्मिती केली आहे. विपुल अमृतलाल शाह हे त्याचे निर्माता आणि सहाय्यक दिग्दर्शक आहेत.

अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'द केरला स्टोरी'च्या ट्रेलरमध्ये अदा शर्माचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे. या चित्रपटात ती शालिनी उन्नीकृष्णनच्या भूमिकेत दिसत आहे. (The Entertainment News)

The Kerala Story Trailer
Sooraj Pancholi's Post: जिया खान प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला...

हिंदू कुटुंबातील शालिनी फातिमा होते. ट्रेलरच्या सुरुवातीला शालिनी म्हणजेच फातिमाला अधिकारी ISIS मध्ये सामील होण्याबाबत प्रश्न विचारतात. त्यावर शालिनी जे उत्तर देते त्याने सगळे निशब्द होतात. ती अधिका-यांना सांगते, 'मी ISIS मध्ये कधी सामील झालो यापेक्षा मी ISIS मध्ये का आणि कशी सामील झाले हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे आहे.'

निष्पाप हिंदू मुलींची कशी दिशाभूल केली जाते हे चित्रपटामध्ये दाखविण्यात आले आहे. त्या मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांना अल्लाहच्या अधीन केले जाते. हिजाब घातलेल्या मुलींवर कधीही बलात्कार आणि अत्याचार होत नाहीत असे त्या मुलींच्या मनावर बिंबवण्यात येते. मग त्या मुली इस्लामचा स्वीकार करतात.

त्या मुलींनी ISIS च्या दहशतवाद्यांसोबत नेऊन सोडले जाते. त्यानंतर होणाऱ्या भयंकर घटनांची या मुलींनी कल्पनाही केली नसेल. माणसाच्या रूपातील क्रूरता काय असते ते या मुली अनुभवतात. ISIS च्या दहशतवाद्यांचा घृणास्पद चेहरा पाहून या मुलींचे हृदय थरथर कापते.

ही कथा फक्त शालिनीची नाही. ही कथा केरळमधून बेपत्ता झालेल्या तिच्यासारख्या ३२ हजार महिलांची आहे. ट्रेलरच्या शेवटी अदा शर्मा म्हणते, 'माझ्यासारख्या हजारो मुली घरातून पळून गेल्या आणि त्या वाळवंटात गाडल्या गेल्या आहेत.

'द केरला स्टोरी'चा ट्रेलरचे आणि अदाच्या अभिनयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 'द केरला स्टोरी' हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. ISIS च्या दहशतवाद्यांचा भारताविरुद्धचा हा घृणास्पद कट उघड झाला तेव्हा संपूर्ण देश हादरला. सर्वत्र खळबळ उडाली.

तुमचे हृदय हेलावून टाकणारी ही सत्य घटना आता तुम्हाला पाहता येणार आहे. ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, चित्रपटाला काय प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com