

Kartik Aryan Wedding: सध्या बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना लगीन घाई लागली आहे. आधी आलिया नंतर आथिया त्यानंतर कियारा आणि नुकतच चंकी पाडेच्या मुलीचंही लग्न उकरलं. लवकरच क्रिती सेनन आणि तमन्ना लग्नाच्या बोहल्यावर चढणार या बातम्यांना बरंच उधाण आलं आहे. मात्र आता अशातच लवकर बॉलिवुडचा चॉकलेट हिरो म्हणजेच कार्तिक आर्यनही लग्न बंधानात अडकणार असल्याचे संकेत त्याने स्वत:चं दिले आहेत.
बॉलिवूडमध्ये कार्तिक आर्यनची बरीच हवा आहे. आधी चित्रपटांमुळे तर आता गर्लफ्रेंमुळे त्याची चर्चा होते. 'भूल भुलैया 2' सुपरहिट ठरल्यानंतर कार्तिकचं नशीब चांगलचं बदलून गेलं आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असतात.
आता बॉलिवुडमधील सगळे कलाकार सिंगलपासून मिंगल होत असल्याने कार्तिकलाही राहवत नाही आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये कार्तिक झी सिने अवॉर्डच्या मंचावर ढोल-ताशाच्या वादनात ग्रँड एंट्री करताना दिसला.
या व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओत कार्तिक म्हणतो, 'बघा, बॉलिवूडमध्ये एकामागून एक सर्वांचेच बँड वाजत आहेत, सर्व घोड्यावर चढत आहेत, सर्वांचेच विकेट पडत आहेत. पण अद्याप माझी एक ही विकेट पडली नाही. ऐलेजिबल सिंगल क्लबमध्ये कोण उरले आहे? अर्थात मीच, पण आता हवामान बदलत आहे, हा सक्त माणूसही वितळत आहे. लग्नाचे लाडू खाऊन पहावे असं वाटतं आहे.
मी प्यार का पंचनामा तर केला आहे, आता लग्नाचाही पंचनामा करतो. त्यामुळे या स्टेजवर तुम्हा सर्वांना साक्षीदार मानून आज मी माझ्या सर्व चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला ही बातमी देऊ इच्छिते की मी लग्न करणार आहे. असं म्हणतं त्याने त्याच्या लग्नाची जाहिरपणे घोषणा केली आहे.
त्याच्या या पंचवर बसलेले सर्व ऑडियन्स जोरजोरात हसु लागतात. आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असुन चाहतेही त्याच्या या निर्णयावर खुप आंनदित आहे. ते देखील या क्षणाची खुप आतुरतेने वाट पहात असल्याचं बोलत आहेत. तर काहींनी कार्तिकला क्रिती सेननसोबत लग्न करण्याचा सल्लाही दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.