Kareena Kapoor: बिकिनी सीनसाठी करिनाने घटवलं होतं 20 किलो वजन, मगच दिसली स्लिम फिट

Kareena Kapoor Transformation: करिना कपूरने टशन चित्रपटातील बिकिनी सीनसाठी तब्बल 20 किलो वजन घटवलं. तिच्या मेहनतीने आणि डाएटमुळे ती झिरो फिगरमध्ये दिसली. तिचा फिटनेस प्रवास प्रेरणादायी आहे.
Kareena Kapoor
Kareena KapoorSaam Tv
Published On

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आजवर अनेक सुपरहिट चित्रपटात दिसली आहे. करिनाने तिच्या सौंदर्याकडे विशेष लक्ष दिले आहे. परफेक्ट फिगरसाठी करिनाने बरीच मेहनत घेतली आहे. तुम्हाला माहितीये का? 2008 रिलीज झालेल्या चित्रपटासाठी करिनाने एक- दोन नाहीतर तब्बल 20 किलो वजन घटवलं होतं. यासाठी करिनाने नेमकं काय केलं होतं सविस्तर जाणून घेऊया.

Kareena Kapoor
Viral Video: भर मिरवणुकीत बैलाने ठोकली धूम, सगळीकडे उडाला गोंधळ अन् ग्रामस्थांची धावपळ, नेमकं काय घडलं?

वजन वाढवणे आणि वजन कमी करणे हा प्रत्येकासाठी खूप मोठा टास्क असतो. अभिनेत्री करिना कपूरने देखील याचा अनुभव घेतला आहे. करिनाने तिच्या एका भूमिकेसाठी 20 किलो वजन कमी केलं होतं. 2008 मध्ये रिलीज झालेल्या 'टशन' चित्रपटात करिना कपूर दिसली. चित्रपटातील करिनाचा लूक आकर्षक दिसला. यासाठी करिनाने वजन कमी करण्यावर भर दिला होता.

Kareena Kapoor
Viral Video: बैलपोळा उत्सवात बैल उधळला; शेतकऱ्यांची पळापळ अन् पुढे काय घडलं ते पाहाच

करिनाने अनेकदा तिच्या मुलाखतीत सांगितले आहे. झिरो फिगर होण्यासाठी बरीच मेहनत असते. चित्रपटातील बिकिनी शूट करणे हे माझ्यासाठी आव्हान होते आणि ते मी पूर्ण केले. करिनाने सांगितले खाण्या- पिण्याच्या सवयी बदलल्या. फळांचे ज्यूस करून प्यायचे. संत्री ज्यूस माझ्यासाठी प्रेरणा ठरले आहे. मी पंजाबी कुटुंबातून आहे आणि माझ्यासाठी पौष्टिक खाणं याशिवाय मी जगू शकत नाही. मात्र तरीदेखील मी हे सर्व सहज करू शकले. चरबीयुक्त पदार्थ खाणे मी पूर्णपणे बंद केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com