Kangana Ranaut reviews Christopher Nolan's Oppenheimer : बॉलिवूडची क्वीन म्हणून कंगना रनौत (Kangana Ranaut) प्रसिद्ध आहे. कंगना तिच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. नुकतच कंगनाने 'ओपेनहायमर' चित्रपटाचे कौतुक केले आहे. चित्रपटाबद्दल कौतुक करतानाचा एक व्हिडिओ कंगनाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
कंगना नेहमीच सगळ्यांना खरीखोटी सुनावत असते. परंतु 'ओपेनहायमर' या चित्रपटाचे कौतुक कंगनाने केले आहे. 'ओपेनहायमर' या चित्रपटावर देशातून टीका होताना दिसत आहे. परंतु चित्रपटाबद्दल कौतुक करत हा चित्रपट नक्की पाहा असं आवाहन कंगनाने केलं आहे.
सोमवारी कंगना रनौतने चित्रपट निर्माता क्रिस्टोफर नोलनचा 'ओपेनहायमर' (Oppenheimer) हा चित्रपट पाहिला. तिने चित्रपटाचे कौतुक करतानाची एक रिल सोशल मीडियावर शेअर केली आहे. चाहत्यांना चित्रपटाबद्दल आणि भगवदगीता संदर्भाबद्दल सांगितले. अणु बॉम्बचे भौतिकशास्त्रज्ञ 'जे रॉबर्ट ओपेनहायमर' यांच्या जीवनावर ओपनहायमर चित्रपट आधारित आहे.
कंगनाने ओपेनहायमर चित्रपट पाहिल्यानंतर, तिने तिचे मत मांडत व्हिडिओ शेअर केला आहे. कंगनाने क्रिस्टोफर नोलनचे कौतुकही केले आहे. व्हिडिओत कंगनाने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन केले आहे. चित्रपटातील तिचा आवडता भाग म्हणजे भगवदगीतेचा संदर्भ आहे, असं कंगनाने सांगितल.
ती म्हणाली, 'ही एका ज्यू भौतिकशास्त्रज्ञाची कथा आहे ज्यांनी 'वर्ल्ड वॉर २' (World War 2)दरम्यान अमेरिकेसाठी अणुबॉम्ब बनवला होता. तो खोलवर विचार करणारा राजकीय व्यक्ती आहे. तो सोव्हिएत युनियनचा एजंट असू शकतो आणि तो देशद्रोही असल्याचे अमेरिकन लोकांना वाटत असल्याने, तो लोकांना चुकीचा सिद्ध करण्यासाठी अणुशक्ती निर्माण करतो.
परंतु, या दरम्यान, त्याची माणुसकी जागी होते आणि त्याला आव्हान देते. ज्यामुळे हा संघर्ष होतो. ही या चित्रपटाची थीम आहे. माझा आवडता भाग म्हणजे श्रीमद भगवदगीता आणि भगवान विष्णू यांचा संदर्भ - जेव्हा ते त्यांच्या अंतरंगातील विष्णूचे माध्यम बनतात'.असं कंगना म्हणाली.
व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शन दिले की, 'क्रिस्टोफर नोलनचे हे आतापर्यंतचे सर्वोत्तम काम. आमच्या काळातील सर्वात महत्त्वाचा चित्रपट. मला चित्रपट संपूच नये असं वाटत होत. त्यात मला मनापासून आवडत असलेले सर्व काही आहे. मला भौतिकशास्त्र आणि राजकारणाची आवड आहे. माझ्यासाठी हा चित्रपट उत्सुकता वाढवणारा एक खूप छान सिनेमॅटिक अनूभव होता. वंडरफूल!'
कंगना आतापर्यंत तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असायची. परंतु या व्हिडिओमुळे कंगनाची एक दुसरी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, कंगनाचा 'चंद्रमुखी २' (Chandramukhi 2)हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 'इमरजन्सी' या चित्रपटातून कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.