Emergency Controversy : कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'ला पंजाबनंतर इंग्लंडमध्येही विरोध; थिएटरमध्ये शो बंद पाडण्याचा प्रयत्न

Emergency Movie Controversy: कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाचा इंग्लंडमध्ये जोरदार निषेध करण्यात येत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान खलिस्तानी समर्थकांनी सिनेमागृहात घुसून चित्रपट थांबवण्याचा प्रयत्न केला आहेत.
Emergency Controversy
Emergency ControversyGoogle
Published On

Emergency Controversy: कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून हा चित्रपट अनेक वादांच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटावर अनेकांनी आक्षेप घेतला असून पंजाबमध्ये कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे, तर आता पंजाबनंतर इंग्लंडमध्येही या चित्रपटावर विरोध करण्यात येत आहे. इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये, खलिस्तानी समर्थकांनी 'इमर्जन्सी' प्रदर्शित होत असलेल्या सिटी व्ह्यू सिनेमा हॉलमध्ये भारता विरोधात घोषणाकरुन या चित्रपटाचा निषेध केला आहे.

खलिस्तानी समर्थकांनी सिटी व्ह्यू सिनेमागृहात 'इमर्जन्सी'चे प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिथे गोंधळ उडाला. जेव्हा सिनेमा हॉलमध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी खलिस्तानी समर्थकांचा निषेध केला तेव्हा त्यांना तेथून परत जावे लागले. दरम्यान, पंजाबमध्येही 'इमर्जन्सी'वर बंदी घालण्यात आली असून चित्रपटाविरोधात घोषणा सुरू आहेत.

Emergency Controversy
Eisha Singh: बिग बॉसच्या घराबाहेर येताच ईशाने केला मोठा खुलासा; म्हणाली, 'आधीपासूनच...'

गदारोळामुळे कंगना दुःखी

'इमर्जन्सी'ला होणारा विरोध पाहून कंगना राणौत दुःखी आहे. तिने एक व्हिडिओ शेअर करून आपली वेदना व्यक्त केली आहे. तसेच, चित्रपट पाहिल्यानंतरच निर्णय घेण्याचे आवाहन अभिनेत्रीने लोकांना केले आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) 'इमर्जन्सी'वर आरोप केला आहे की हा चित्रपट शिखांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या चित्रपटात इतिहास देखील चुकीच्या पद्धतीने सादर केला गेला आहे.

Emergency Controversy
Tabu: जाहीर माफी मागा; अभिनेत्री तब्बू इतकी का संतापली? कारण काय?

पंजाबमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यासाठी एसजीपीसीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले

त्याचवेळी, कंगनाने सांगितले की, तिचे देशावरील प्रेम तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटातून दिसून येते. अभिनेत्रीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की पंजाब व्यतिरिक्त यूके आणि कॅनडामध्येही असेच निषेध झाले आहेत आणि ही आग काही लहान लोकांनी लावली आहे. दुसरीकडे, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी यांनी काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहिले होते. पत्रात त्यांनी पंजाबमध्ये 'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com