Kangana Ranaut Statement: हिंदुत्वावर बोलले म्हणून 30-40 कोटींचं नुकसान झालं, कंगना रनौत असे का म्हणाली?

Bollywood Latest News: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगना रनौत अनेकदा अडचणीत देखील आली आहे.
Kangana Ranaut
Kangana Ranaut- Saam Tv

Bollywood News: बॉलिवूडची (Bollywood) 'कॉन्ट्रोवर्सी क्वीन' कंगना रनौत (Actress Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि ट्वीटमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर (Social Media) परखडपणे आपली मतं मांडत असते. कंगना रनौत या वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत देखील आली आहे.

या परखडपणाचा कंगनाला मोठा फटका बसला आहे. कंगनाला हिंदुत्व, देशद्रोह, राजकारणी यांच्याविरोधात वक्तव्य करण्याची किंमत चुकवावी लागली आहे. यामुळे तिच्या हातातून काम गेले. ऐवढंच नाही तर तिचे 30 ते 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले. स्वत: कंगनाने हा दावा केला आहे.

Kangana Ranaut
TDM Film New Release Date: ‘तो’ पुन्हा येतोय; भाऊराव कऱ्हाडेंचा TDM होणार रिलीज

कंगना रनौतने दावा केला आहे की, 'हिंदुत्वासाठी बोलण्याची, राजकारण्यांविरोधात बोलण्याची, तुकडे तुकडे आणि देशद्रोहींविरोधात आवाज उठवण्याची किंमत आपण चुकवली आहे. उघडपणे बोलल्यामुळे अनेक ब्रँडच्या जाहिराती मला गमवाव्या लागल्या. त्यामुळे 30 ते 40 कोटी रुपयांचे माझे नुकसान झाले आहे.' कंगना रनौतने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत हा दावा केला आहे.

कंगना राणावतने इन्स्टाग्रामवर ट्विटरचे मालक एलॉन मस्कची एक बातमी शेअर केली आहे. ज्यामध्ये एलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, 'मला जे वाटेल ते मी बोलेन, त्यासाठी मला आर्थिक नुकसान सहन करावे लागले तरी चालेल.' एलॉन मस्क यांचे हे वक्तव्य शेअर करत कंगना रनौतने तिला झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल सांगितले आहे.

Kangana Ranaut Insta Post
Kangana Ranaut Insta PostInstagram
Kangana Ranaut
Mumbai Diamond Theft: सलमान खानच्या बहिणीच्या घरात चोरी, हिऱ्याचे दागिने चोरांनी केले लंपास

कंगना रनौतने इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले की, 'हे खरे स्वातंत्र्य आणि यशाचे पात्र आहे. हिंदुत्वावर बोलणे, राजकारणी, देशद्रोही, तुकडे तुकडे गँग यांच्या विरोधात वक्तव्ये करणे याचा तोटा म्हणजे मला 20-25 ब्रँडच्या जाहिरातींमधून काढून टाकण्यात आले. त्यांनी मला एका रात्रीत काढून टाकले. यामुळे माझे दरवर्षाला 30 ते 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले.'

कंगनाने पुढे असे लिहिले की, 'तिच्यासोबत हे सर्व घडले असले तरी ती स्वतंत्र आहे आणि तिला जे बोलायचे आहे ते बोलण्यापासून तिला कोणीही रोखू शकत नाही.' या इन्स्टा पोस्टमध्ये तिने एलॉन मस्क यांचे कौतुक सुद्धा केले आहे. 'प्रत्येकजण त्यांची कमजोरी दर्शवतो. निदान श्रीमंतांनी तरी पैशाचा विचार करू नये.', असे तिने म्हटले आहे. कंगना रनौत तिच्या या इन्स्टा पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या तिची ही इन्स्टा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com