Kajol Slapped Actor: १, २ नव्हे १० वेळा अभिनेत्याच्या कानाखाली मारली; काजोल 'या' कारणामुळे संतापली

Kajol Slapped Actor: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री काजोलने तिच्या पहिल्या चित्रपटाच्या सेटवर गोंधळ घातला. तिने तिच्या पहिल्या अभिनेत्याला एकामागून एक दहा वेळा कानाखाली मारलं.
Kajol Slapped Actor
Kajol Slapped ActorSaam Tv
Published On

Kajol Slapped Actor: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री काजोल वयाच्या ५१ व्या वर्षीही काम करत आहे. ९० च्या दशकात, तिने मुख्य अभिनेत्री म्हणून तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. काजोल तिच्या चित्रपटांसह, तिच्या सेटवरील सवयींमुळे अनेकदा चर्चेत असते. आज, काजोलच्या पहिल्या चित्रपटातील एक घटनेबद्दल जाणून घेऊयात. तिने तिच्या पहिल्या चित्रपटात सहकलाकाराला सेटवर तब्बल दहा वेळा कानाखाली मारलं होतं. त्यामुळे दिग्दर्शकासह सर्वांनाच धक्का बसला.

तिच्या ३३ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत, काजोलने "कभी खुशी कभी गम", "करण अर्जुन", "इश्क", "फना", "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे", "गुप्त" आणि "तान्हाजी: द अनसंग वॉरियर" यासह अनेक उल्लेखनीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. काजोलने कमल सदानह अभिनीत "बेखुदी" द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Kajol Slapped Actor
Vidya Balan: विद्या बालनचा खास नवरात्री लूक पाहिलात का?

म्हणूनच काजोलने कमलला १० वेळा कानाखाली मारली

बेखुदी १९९२ मध्ये प्रदर्शित झाला. हा काजोलचा पहिला चित्रपट होता, तसेच कमल सदनहचाही. ३३ वर्ष जुन्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल रवैल यांनी केले होते आणि रीता रवैल आणि महारुख जुखी यांनी निर्मिती केली होती. एक सीन काजोल कमलला कानाखाली मारणार असा होता. त्या सीनमध्ये काजोलला कळते की कमलने तिच्या भावाची हत्या केली आहे आणि ती रागात त्याला जोरदार कानाखाली मारते.

Kajol Slapped Actor
Raj Kundra: १५० कोटींचे बिटकॉईन, ईडीने फास आवळला, राज कुंद्राच्या विरोधात चार्जशीट दाखल

काजोल तिच्या भूमिकेत पूर्णपणे बुडाली. तिने कमलला खूप जोरात कानाखाली मारली. दिग्दर्शकाने तिला सांगितले की त्याला इतक्या जोरात कानाखाली मारू नका. पण, काजोलने तोच प्रकार पुन्हा केला आणि सलग दहा वेळा कमलला कानाखाली मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com