Jitendra Awhad : दोन वेळच्या जेवणासाठी देवळाच्या बाहेर उभा राहायचा...जितेंद्र आव्हाडांनी सांगितली सूरजची कहाणी

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी 5' ची ट्रॉफी सूरजने उचलली. सूरजचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.
Suraj Chavan
Jitendra AwhadSAAM TV
Published On

रिल्सस्टार सूरजने (Suraj Chavan) 'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi) जिंकून भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. रितेश भाऊंनी स्पर्धकांची वेळोवेळी कानउघाडणी केली होती. सूरज बिग बॉस जिंकल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सूरजचे कौतुक केले आहे. एक खास पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सूरजचा फोटो पोस्ट करत लिहिलं की, "पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोढवे गावचा मुलगा बिग बॉस मराठीचा विजेता झाला आहे. तो मोढवे गावचा आई मरी मातेच्या मंदिराबाहेर उभा राहून दिवसातून 3 वेळा डोकावून पाहायचा की नारळ आले आहेत का, ते तो उचलून खायचा आणि आपली भूक भागवायचा. रिल्सस्टार सूरजने बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घातला आहे. अखेर त्याने मानाची ट्रॉफी आपल्या पदरात पाडली आहे. सूरजची क्रेझ बिग बॉसच्या सुरुवातीपासूनच पाहायला मिळाली. बिग बॉससारख्या रिॲलिटी शोमध्ये 274 लोकांमधून अंतिम 16 मध्ये त्याची निवड झाली आणि आता तो विजयी झाला आहे. ही अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. जिंकलंस भावा..."

'बिग बॉस मराठी 5' च्या टॉप 3 मध्ये सूरज, निक्की आणि अभिजीत येतात. यंदाचा बिग बॉस अवघ्या 70 दिवसात संपला. मात्र 70 दिवसातही या शो ने भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. तसेच सूरजवर आता नवीन चित्रपट देखील येणार आहे. सूरजच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Suraj Chavan
Ajit Pawar : बारामतीचा सुपुत्र अन् महाराष्ट्राचा अभिमान... अजित दादांकडून सूरजचं तोंड भरून कौतुक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com