Jayanti 2 Marathi Movie: संत्याच्या आयुष्यात नवं वादळ! 'जयंती २'मध्ये उलगडणार सामाजिक परिवर्तनाची कहाणी

Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती २'चा पोस्टर लाँच करण्यात आला असून हा चित्रपट ११ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. ऋतुराज वानखेडेसह प्रियदर्शनी इंदलकर आणि रोहिणी हट्टंगडी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Jayanti 2 Marathi Movie
Jayanti 2 Marathi MovieSaam Tv
Published On

Jayanti 2 Marathi Movie: २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि तरुणाईच्या मनाला भिडलेल्या 'जयंती' या मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित सिक्वेल आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जयंती २' हा चित्रपट येत्या ११ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, नुकतेच या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टर लाँच झाल्यानंतर चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.

पहिल्या भागाप्रमाणेच 'जयंती २' मध्येही समाजातील महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आजच्या तरुण पिढीवर होणारा प्रभाव, सामाजिक परिवर्तन आणि वैचारिक जागृती या संकल्पनांवर आधारित कथानक या चित्रपटात अधिक प्रभावीपणे मांडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी संत्या हे पात्र एका नव्या आणि ज्वलंत आव्हानाला सामोरे जाणार असल्यामुळे कथानकाबाबत प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

Jayanti 2 Marathi Movie
Actor Death: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; मुलाने दिली निधनाची बातमी, सिनेविश्वाला मोठा धक्का

मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित या चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांनी केले आहे. पहिल्या भागातील प्रमुख अभिनेता ऋतुराज वानखेडे पुन्हा एकदा मध्यवर्ती भूमिकेत झळकणार असून, त्याच्यासोबत प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे आणि मानसी सुभाष यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दमदार कलाकारांची फौज आणि आशयघन कथा यामुळे चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

Jayanti 2 Marathi Movie
Actor in Old Age Home: १०० चित्रपटात काम केलं; पण आज अभिनेत्याकडे औषधांसाठीही पैसे नाहीत, वृद्धाश्रमात काढतायेत दिवस

चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांनी सांगितले की, 'जयंती'च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. विशेषतः चित्रपटातील सामाजिक आशय आणि तरुणांच्या भावना प्रभावीपणे मांडल्यामुळे त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. 'जयंती २'च्या चित्रीकरणाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता या सिक्वेलमध्ये कथानक कोणते नवे वळण घेणार आणि संत्या कोणते आव्हान स्वीकारणार, याची उत्तरे ११ सप्टेंबरला चित्रपटगृहात मिळणार आहेत. दिग्दर्शकांनी हा चित्रपटही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com