Javed Akhtar: 'तुझ्या पूर्वजांनी ब्रिटिशांचे बूट चाटले...'; 'पाकिस्तानी' म्हटल्याने जावेद अख्तर भडकले, ट्रोलरची केली बोलती बंद

Javed Akhtar: १५ ऑगस्ट रोजी जावेद अख्तर यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आणि देशवासियांना शुभेच्छा दिल्या. जावेदच्या या पोस्टवर एका नेटकऱ्यांने त्यांना पाकिस्तानी म्हणत ट्रोल केले.
Javed Akhtar
Javed AkhtarSaam Tv
Published On

javed Akhtar: गीतकार-लेखक जावेद अख्तर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. जावेद केवळ सोशल मीडियावर सक्रिय नसून, नेटकऱ्यांच्या प्रत्येक कमेंटवरही बारकाईने लक्ष ठेवतात. एवढेच नाही तर जावेद अख्तर प्रत्येक वेळी ट्रोलर्सना योग्य उत्तर देतानाही दिसतात. १५ ऑगस्ट रोजीही असेच काहीसे घडले. जावेद अख्तर यांनी १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक लांब पोस्ट लिहिली आणि देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जावेद अख्तर यांच्या या पोस्टवर एका नेटकऱ्यांने त्यांना पाकिस्तानी म्हणत ट्रोल केले. आता जावेद अख्तर यांनी त्याचा चांगलेच उत्तर दिलं आहे.

जावेद यांनी १५ ऑगस्ट रोजी पोस्टवर ट्रोल केले

१५ ऑगस्ट रोजी जावेद अख्तर यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आणि या स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले, 'माझ्या सर्व भारतीय बंधू आणि भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आपण हे विसरू नये की स्वातंत्र्य आपल्याला ताटात बसून दिले गेले नव्हते. आज आपण त्या लोकांना आठवले पाहिजे आणि त्यांना सलाम केला पाहिजे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुरुंगात गेले. ज्यांना फाशी देण्यात आली. आपण ही मौल्यवान भेट वाया जाऊ देऊ नये.' जावेद अख्तर यांच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली. पण एका युजरने अशी कमेंट केली ज्यामुळे अख्तर साहेब संतापले.

Javed Akhtar
Param Sundari: सिद्धार्थ-जान्हवीचा 'परम-सुंदरी' वादाच्या भोवऱ्यात, एका सीनमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी, वाचा नेमकं प्रकरण

तुमचे वडील आणि आजोबा इंग्रजांचे बूट चाटत होते

खरं तर, जावेद अख्तर यांच्या या पोस्टवर एका युजरने कमेंट केली आणि लिहिले, 'तुमचा स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्ट आहे.' मग काय, जावेदने त्याला युजरला उत्तर दिले आणि लिहिले, 'बेटा, जेव्हा तुझे वडील आणि आजोबा इंग्रजांचे बूट चाटत होते. त्यावेळी माझे वडील देशाच्या स्वातंत्र्यासाठी काला पाणीची शिक्षा भोगत होते. तुमच्या मर्यादेत राहा.' सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी जावेदच्या या उत्तराचे समर्थन केले.

Javed Akhtar
Coolie VS War 2 Box Office Collection: 'कुली' आणि 'वॉर 2' मध्ये कांटे की टक्कर; दुसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

जावेद अख्तर यांचे पणजोबा, आजोबा, वडील कवी होते

जावेद अख्तर यांचे पणजोबा, फजल-ए-हक खैराबादी (१७९७-१८६१) हे एक प्रसिद्ध भारतीय इस्लामिक विद्वान, कवी आणि स्वातंत्र्यसैनिक होते ज्यांनी ब्रिटिश राजवटीला विरोध केला आणि १८५७ च्या भारतीय बंडाला फतव्याद्वारे पाठिंबा दिला, ज्यामुळे त्यांना अंदमान बेटांवर निर्वासित करण्यात आले, जिथे त्यांचे निधन झाले. त्यांचे आजोबा, मुज्तर खैराबादी आणि वडील जान निसार अख्तर हे देखील प्रसिद्ध कवी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com