Jana Nayagan: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांच्या बहुप्रतीक्षित 'जन नायकन' (Jana Nayagan) या चित्रपटाच्या प्रदर्शणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपासून विविध कारणांमुळे रखडलेला हा चित्रपट आता २३ जुलै २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही घोषणा केली. या पोस्टमध्ये थलपती विजय यांचा दमदार आणि निर्भय लूक पाहायला मिळत आहे.
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीचा अखेरचा चित्रपट
'जन नायकन'ची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. प्रदर्शनाची तारीख वारंवार पुढे ढकलली जात असल्याने चाहत्यांची प्रतीक्षा वाढली होती. अखेर रिलीज डेट निश्चित झाल्याने विजय यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. थलपती विजय यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीच 'जन नायकन' हा आपल्या कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट असेल, अशी घोषणा केली होती. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग पूर्ण केले होते. मात्र, त्यानंतर चित्रपट सेन्सॉर प्रक्रियेमध्ये अडकला आणि त्यामुळे त्याच्या प्रदर्शनाला विलंब झाला. आता सर्व अडथळे दूर झाल्यानंतर हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
चित्रपट लीक झाल्यामुळे रंगली चर्चा
प्रदर्शनापूर्वीच 'जन नायकन' एका मोठ्या वादातही सापडला होता. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाची एक प्रिंट ऑनलाइन लीक झाल्याने निर्मात्यांची चिंता वाढली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निर्मात्यांनी ही लिक झालेली चित्रपटाची प्रिंट इंटरनेटवरून हटवण्यासाठी तातडीने पावले उचलली. तसेच दोषींविरोधात कायदेशीर कारवाई केली.
बॉक्स ऑफिसवर मोठ्या कमाईची अपेक्षा
'जन नायकन' हा थलपती विजय यांच्या कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट असल्याने त्याबाबत प्रेक्षकांमध्ये विशेष आकर्षण आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट असल्याने त्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटाची कथा, विजय यांचा दमदार लूक आणि त्यांच्या चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा पाहता 'जन नायकन' बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.