The Royals: 'एक था राजा एक थी...'; भुमी पेडणेकर आणि ईशान खट्टरची 'द रॉयल्स' लव्हस्टोरी

The Royals Web Series: लवकरच नेटफ्लिक्सवर 'द रॉयल्स' ही नवीन रोमँटिक कॉमेडी वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत भुमी पेडणेकर आणि ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत आहेत.
The Royals
The RoyalsSaam tv
Published On

The Royals: लवकरच नेटफ्लिक्सवर 'द रॉयल्स' ही नवीन रोमँटिक कॉमेडी वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत भुमी पेडणेकर आणि ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत आहेत. ही कथा एका जुन्या राजघराण्याच्या राजकुमाराची आणि एका मॉर्डन बिझनेसवूमनची आहे, ज्यांची अनपेक्षित भेटीमुळे एका प्रेमकथेची सुरुवात होते.

ईशान खट्टर या सिरीजमध्ये एका राजकुमाराची भूमिका साकारत असून, भुमी पेडणेकर एक स्वतंत्र आणि आत्मनिर्भर मॉर्डन बिझनेसवूमन म्हणून दिसणार आहेत. ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या सिरीजचे चित्रीकरण उदयपूरच्या सिटी पॅलेससारख्या भव्य ठिकाणी झाले आहे, त्यामुळे सिरीजला एक शाही लुक मिळाला आहे.

The Royals
Neha kakkar: नेहा कक्कर बहिणीला विसरली; टोनीसाठी केला टॅटू पण सोनूच नावही नाही, चाहते संतापले

'द रॉयल्स' ही सिरीज प्रितीश नंदी कम्युनिकेशन्सने तयार केली असून, रंगिता आणि इशिता प्रितीश नंदी यांनी त्याची निर्मिती केली आहे. या मालिकेत साक्षी तन्वर, झीनत अमान, नोरा फतेही, चंकी पांडे, लिसा मिश्रा आणि विहान समत यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

The Royals
Sagar Karande: सागर कारंडे फसवणूक प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; ६१ लाखांचा घोटाळा उघड

ही सिरीज एक रॉयल लव्हस्टोरी असून, त्यात जुन्या राजघराण्याची परंपरा आणि मॉर्डन बिझनेसवूमनची महत्वाकांक्षा दाखवण्यात आली आहे. या मालिकेत रोमँस, विनोद आणि नाट्य यांचा सुंदर संगम आहे. 'द रॉयल्स' ही मालिका ९ मेपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com