Pawandeep Rajan: इंडियन आयडॉल विजेता पवनदीप अपघातानंतर ICU मध्ये; ऑपरेशनची तयारी सुरु

Pawandeep Rajan Accident: इंडियन आयडॉल 12 चा विजेता गायक पवनदीप राजनचा 5 मे रोजी सकाळी उत्तर प्रदेशजवळ भीषण अपघात झाला. पवनदीपच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले असून डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे.
Pawandeep Rajan
Pawandeep RajanSaam Tv
Published On

Pawandeep Rajan Accident: इंडियन आयडॉल 12 चे विजेते गायक पवनदीप राजनचा 5 मे रोजी सकाळी उत्तर प्रदेशातील मुरादाबादजवळ भीषण अपघात झाला. अहमदाबादमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या पवनदीपच्या कारची एका उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात पवनदीपसह त्याचा ड्रायव्हर राहुल सिंग आणि मित्र अजय मेहरा हे तिघेही गंभीर जखमी झाले. पवनदीपच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले असून डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे.

अपघातानंतर तिघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण पवनदीपच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता त्याला नोएडातील फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्याच्यावर सायंकाळी 7 वाजता 6 तासांचे ऑपरेशन करण्यात आले. या ऑपरेशननंतर त्याला ICU मध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, 3-4 दिवसांच्या विश्रांतीनंतर उर्वरित फ्रॅक्चर आणि इतर जखमांवर पुन्हा ऑपरेशन करण्यात येणार आहे.

Pawandeep Rajan
Met Gala 2025: मेट गाला 2025च्या पायऱ्यांवरून पडला 'हा' प्रसिद्ध गायक...; व्हायरल फोटो मागील सत्य काय?

पवनदीपच्या टीमने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीद्वारे त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, "कालचा दिवस पवनदीपच्या कुटुंब आणि चाहत्यांसाठी अत्यंत कठीण होता. पवनदीप दिवसभर तीव्र वेदनेत होते आणि बेशुद्ध होते. संध्याकाळी 7 वाजता त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले आणि 6 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर काही मोठ्या फ्रॅक्चरवर उपचार करण्यात आले. सध्या तो ICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. 3-4 दिवसांच्या विश्रांतीनंतर उर्वरित फ्रॅक्चर आणि जखमांवर पुन्हा शस्त्रक्रिया केली जाईल."

Pawandeep Rajan
Avneet Kaur: विराट कोहलीचा एका 'लाइक'; अवनीत कौरच्या करिअरला मिळालं नव वळण, एक रात्रीत बदललं आयुष्य

पवनदीप राजन यांनी इंडियन आयडॉल 12 जिंकून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. त्याच्या सुरेल आवाजाने आणि संगीताच्या कौशल्याने त्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. सध्या त्याच्या प्रकृतीसाठी चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात येत आहे. त्याच्या टीमने देखील सर्वांच्या प्रार्थनांसाठी आभार मानले आहेत आणि पवनदीप लवकरच पूर्णपणे बरा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com