सध्या सर्वत्र क्रिकेटची चर्चा पाहायला मिळते. गेल्या खूप वेळापासून टीम इंडियाचा क्रिकेटर शिखर धवन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याने आजवर चौकार आणि षटकार मारून मॅचमध्ये धुमाकूळ घातला आहे. आता शिखर धवन एका वेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan ) आता आपल्या डान्स आणि अभिनयातून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. ही गुडन्यूज त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली आहे.
शिखर धवनच्या 'बेसोस' (Besos) या गाण्याचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. याची पोस्ट शिखरने सोशल मीडियावर केली आहे. पोस्टरमध्ये शिखर धवन एक वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे. या गाण्यात शिखर धवन बॉलिवूडच्या एका अभिनेत्री सोबत रोमँटिक अंदाजात पाहायला मिळणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून जॅकलिन फर्नांडिस आहे. शिखर धवन आणि जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) पहिल्यांदाच एकत्र या गाण्यातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.
Besos गाण्याच्या पोस्टरला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की,"पॉपची एक ठिणगी, जोशाची एक लाट...तुम्ही सर्व Besos साठी तयार आहात का?" शिखर धवनच्या चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रेक्षक या गाण्यासाठी उत्सुक आहेत. शिखर धवनचे हे हटके गाणे 8 मे ला सकाळी 11 वाजता रिलीज होणार आहे.
चाहते आता गाण्याच्या टिझरसाठी आतुर असल्याचे पाहायला मिळत आहे. पोस्टमध्ये जॅकलिन फर्नांडिस समुद्रकिनारी बीच लूकमध्ये पाहायला मिळत आहे. तर शिखर धवनच्या बॉसी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टरमध्ये शिखर धवनचा स्वॅग लय भारी दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.