Arati Tikekar Dance Video: स्वानंदीच्या मेहंदी कार्यक्रमात आई आरती टिकेकरचा अफलातून डान्स, 'लुंगी डान्स' गाण्यावर धरला ठेका

Swanandi Tikekar Mother Dance Viral Video: स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा नुकताच मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. स्वानंदीची आई आणि शास्त्रीय गायिका आरती टिकेकर यांनी मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये जबरदस्त डान्स केला आहे.
Swanandi Tikekar Mother Dance Viral Video
Swanandi Tikekar Mother Dance Viral VideoSaam Tv
Published On

Swanandi Tikekar Mother Arati Tikekar Dance Viral Video

सध्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये लगीनसराई धुमधडाक्यात सुरु आहे. प्रसाद-अमृता, सुरुची- पियुष, मुग्धा-प्रथमेशनंतर आणखी मराठमोळी लोकप्रिय जोडी लग्नगाठ बांधणार आहे. स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा नुकताच मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या मेहंदीतील अनेक फोटो व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहेत. अभिनेत्री स्वानंदी टिकेकरची आई आणि शास्त्रीय गायिका आरती टिकेकर यांनी मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये एका बॉलिवूड गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे.

Swanandi Tikekar Mother Dance Viral Video
Salaar 3rd Day Collection: प्रभासच्या ‘सालार’ने पहिल्याच विकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस, आता ५०० कोटींच्या क्लबकडे वाटचाल

अभिनेत्री आणि गायिका स्वानंदी आणि गायक आशिष यांच्या मेहंदीच्या कार्यक्रमातील फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नुकतंच 'राजश्री मराठी'या युट्यूब चॅनलच्या सोशल मीडिया पेजवर आरती टिकेकर यांच्या डान्सचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यांनी किंग खानच्या 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटामधील 'लुंगी डान्स' गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे. सध्या त्यांच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अगदी किंग खानसारख्याच हूकस्टेप्स करण्याचा आरती यांनी प्रयत्न केला आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. स्वानंदी आणि आशिषच्या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये, काही परदेशी पाहूणे सुद्धा दिसत आहे.

मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनीही जबरदस्त ठुमके लावलेले पाहायला मिळत आहे. स्वानंदी-आशिष २५ डिसेंबर अर्थात आज लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून स्वानंदीने आशिषसोबतचे अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

Swanandi Tikekar Mother Dance Viral Video
Dunki Special Screening: राष्ट्रपती भवनमध्ये 'डंकी'चे स्पेशल स्क्रिनिंग, चित्रपट टॅक्स फ्री करण्याची होतेय मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com