Ileana D Cruz: बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ दुसऱ्यांदा आई झाली आहे. दोन वर्षांच्या अंतरानंतर तिने तिच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे. तिने इंस्टाग्रामवर ही गुड न्यूज शेअर केली आहे. तिने तिच्या दुसऱ्या बाळाची पहिली झलकही दाखवली आहे आणि त्याचे नाव काय आहे याची माहिती देखील दिली आहे. त्यानंतर इंडस्ट्रीतील सर्व अभिनेत्रींनी तिला अभिनंदन केले आहे.
इलियाना डिक्रूझने १ ऑगस्ट २०२३ रोजी तिचा पहिला मुलगा कोआ फिनिक्स डोलनचे स्वागत केले. तिने स्वतःला इंडस्ट्रीपासून दूर केले आहे. ती बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यावर दिसली नाही. आणि आता तिने दुसऱ्यांदा आई होऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर पोस्ट करून सांगितले की तिने १९ जून २०२५ रोजी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्याचा गोंडस ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आणि त्याचे नावही जाहीर केले.
इलियाना डिक्रूझने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव ठेवले आहे
तिच्या मुलाच्या फोटोवर इलियानाने लिहिले, 'तुम्हाला कीनू राफे डोलनची ओळख करून देत आहे. त्याचा जन्म १९ जून २०२५ रोजी झाला.' तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'आमचे मन भरून आले आहे.' प्रियांका चोप्रा, अथिया शेट्टी, विद्या बालन, मलायका अरोरा, करणवीर शर्मा, शोफी चौधरी, रिद्धिमा तिवारी, डब्बू मलिक,अंजना सुखानी, झहीर इक्बाल आणि इतरांनी अभिनेत्रीला अभिनंदन केले आणि मुलावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
इलियाना डिक्रूझचा पती आणि लग्न
तिच्या पहिल्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केल्यानंतर लगेचच, इलियानाने ऑक्टोबर २०२४ मध्ये सांगितले होते की ती दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. तिने २०२३ मध्ये मायकल डोलनशी लग्न केले आणि त्याच वर्षी ती आई देखील झाली. ती शेवटची विद्या बालन आणि प्रतीक गांधी अभिनीत 'दो और दो प्यार' मध्ये दिसली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.