IFFI Award: आजपासून इफ्फीला सुरुवात, चित्रपटप्रेमींसाठी खास मेजवानी

आजपासून गोव्यात ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
IFFI
IFFISaam Tv

IFFI Award: आजपासून गोव्यात ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहूण्यांची उपस्थिती असणार आहे. गोव्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्रीदेखील यावेळी उपस्थित राहणार आहे. गोव्यातील प्रमुख चौकात सोबतच गोव्याची राजधानी पणजीमध्ये भव्य- दिव्य सजावटही करण्यात आली आहे.

IFFI
Marathi Movie Motion Poster: धोंडी-चंप्याला लग्नाची घाई; 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' चे हटके मोशन पोस्टर प्रदर्शित

या कार्यक्रमाला आज शाम मुखर्जी स्टेडियमवर बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, सुनिल शेट्टी, प्रभू देवा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या महोत्सवात पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित 'दृश्यम २' च्या खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच यावेळी एसएस राजामौलींचा 'आरआरआर' तर बिग बी अमिताभ बच्चन यांचा 'अभिमान' चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

IFFI
Aindrila Sharma:प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; अवघ्या २४ व्या वर्षी ऐंद्रिला शर्माने घेतला अखेरचा श्वास

सोबतच लाडक्या चाहत्यांसाठी पहिल्या दिवशी आणखी एका सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अद्वैत चौहान, गुलशान ग्रोव्हर, पियुष गुप्ता, व्ही. विजयेंद्र आणि पंकज त्रिपाठी यांच्या विशेष सत्राचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची सुरुवात डायटर बर्नर दिग्दर्शित 'अल्मा आणि ऑस्कर' यांच्या सिनेमाने होणार आहे. तर क्रिसझटॉप झानुसी यांच्या 'परफेक्ट नंबर' चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे. देशासह विदेशातील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेप्रेमी या महोत्सवाला हजेरी लावणार आहे.

इफ्फीमध्ये पाच मराठी सिनेमांची निवड झाली आहे. यात विक्रम पटवर्धन यांचा 'फ्रेम', दिग्पाल लांजेरकचा 'शेर शिवराज', डॉ. सलील कुलकर्णी यांचा 'एकदा काय झालं', प्रवीण तरडे यांचा 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' आणि शेखर रणखांबे यांच्या 'रेखा' या सिनेमांचा समावेश आहे. 'थ्री ऑफ अस', 'द स्टोरी टेलर', 'मेजर', 'सिया', 'द कश्मीर फाइल्स' हे बॉलिवूडमधील बहुचर्चित सिनेमे दाखवले जाणार आहेत. तसेच एस.एस राजामौलींचा 'आरआरआर' हा तेलुगू भाषेतील सिनेमा प्रेक्षकांना पाहाण्याची संधी मिळणार आहे.

IFFI
Ranveer Singh Emotional Video: आई-वडिलांसमोर रणवीर सिंगला रडू आवरेना, 'या' जुन्या आठवणीने अभिनेता झाला भावुक

मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांचं खास स्क्रिनिंग असणार आहे. सिनेमाप्रेमींना आठवडाभर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जवळपास आठवडाभर हा महोत्सव सुरू असणार आहे. अनेक दिग्गज कलाकार मंडळींच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडणार आहे. त्यामुळे यंदा कोणते कलाकार चित्रपट महोत्सवाला उपस्थित राहणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com