Aindrila Sharma:प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; अवघ्या २४ व्या वर्षी ऐंद्रिला शर्माने घेतला अखेरचा श्वास

१५ नोव्हेंबर रोजी तिला वेगवेगळे हृदय विकाराचे झटके आले.
Aindrila Sharma
Aindrila SharmaSaam TV

Aindrila Sharma:मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. खूप कमी वयात एका प्रसिद्ध अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला आहे. तिच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बंगाली सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ऐंद्रिला शर्माने या जगाचा निरोप घेतला आहे. रविवारी २० नोव्हेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री बऱ्याच काळापासून आजारी होती. अशात तिला काही दिवसांपूर्वी हृदय विकाराचे झटके (Hart Atac) आले होते. त्यामुळे जवळच्या खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान डॉक्टरांनी तिला CPR देखील केले. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र आज वयाच्या २४ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला.

१ नोव्हेंबर रोजी अचानक ती बेशुध्द पडली. त्यामुळे रुग्णालात दाखल केल्यावर तिला ब्रेन स्ट्रोक झाल्याचे समजले. या आजाराने तिच्या मेंदूत गाठी जमा झाल्या होत्या. डॉक्टरांनी (Doctor) सुरूवातीला यावर उपचार केले. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी तिला वेगवेगळे हृदय विकाराचे झटके आले. याने तिची प्रकृती आणखीनच खालावली होती.

Aindrila Sharma
World Brain Day: ब्रेन स्ट्रोकची लक्षणे व धोक्याविषयी जाणून घ्या

कर्करोगावर दोनदा केली मात

अभिनयात यशाचे शिखर गाठत असतानाच ऐंद्रिलाला कर्करोग असल्याचे निदान झाले होते. पहिल्यांदा ती या रोगावर मात करून बाहेर पडली. मात्र नंतर पुन्हा तिला याचा त्रास होऊ लागला. दुसऱ्यांदा त्रास जाणवल्यावर तिची किमो थेरेपी देखील झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी तिचा कर्करोग (Cancer) पूर्ण बरा झाल्याचे जाहीर केले होते.

Aindrila Sharma
Lungs Cancer : फुफ्फुसाच्या कर्करोगाशी संबंधित असणाऱ्या या गोष्टींबद्दल माहितेय का ?

दुसऱ्यांदा कर्करोगावर मात केल्यावर अभिनेत्रीने पुन्हा अभिनयात तिचे पाउल ठेवले. तिने झुमुर या मालिकेतून तिच्या अभिनयातील कारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यानंतर तिने अनेक प्रसिध्द टिव्ही शो, मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली. अभिनयात तिला आणखीन मोठ्या यशाला गवसणी घालायची होती. मात्र नियतीच्या मनात काही भलतेच होते.

खूप कमी वयातच तिने या जगाचा निरोप घेतला. ऐंद्रिलाने बंगाली सिनेविश्व खूप कमी कालावधीतच गाजवले होते. त्यामुळे तिचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे. तिच्या निधनाने सर्वच चाहते भावुक झाले आहेत. सोशल मीडियावर अनेक कलाकार आणि ऐंद्रिलाचे चाहते शोक व्यक्त करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com