War 2 Trailer: हृतिक रोशनची हत्या होणार?, पण कुणाच्या हातून? War 2 मागे अनेक तर्कवितर्क

War 2 Trailer: हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या बहुप्रतिक्षित 'वॉर २' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर 2 ही वाईआरएफ स्पाय युनिव्हर्स मधील एक महत्त्वाचा चित्रपट आहे.
War 2
War 2Saam Tv
Published On

War 2 Trailer: यशराज फिल्म्सचा 'स्पाय युनिव्हर्स' हा भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट विश्वांपैकी एक आहे. त्याच्या शेवटच्या पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. आता या 'स्पाय युनिव्हर्स' मधील 'वॉर २' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर सारखे सुपरस्टार आहेत. यावेळी 'वॉर २' ची कथा काय असेल? याबद्दल जाणून घेऊयात.

'वॉर २' मध्ये हृतिक कोणत्या मोहिमेवर गेला आहे?

कबीर म्हणजेच हृतिक रोशन यावेळी त्याच्या देशासाठी एका मोहिमेवर गेला आहे ज्यामध्ये त्याला त्याची ओळख आणि जवळचे लोक कायमचे मागे सोडून गेले आहेत. तसेच RAW मध्ये आणखी एक एजंट आहे जो त्याच्या देशासाठी अशी प्रत्येक लढाई लढेल जी इतर कोणीही लढू शकत नाही. तो योग्य आणि अयोग्य काहीही असो, त्याचा देश पुढे जात राहण्यासाठी सर्वकाही करेल.

War 2
Saiyaara Box Office Collection: 'सैयारा'ची आठवड्याभरात छप्परफाड कमाई; सातव्या दिवशी केला इतक्या कोटींचा गल्ला

अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर 2 ही वाईआरएफ स्पाय युनिव्हर्स मधील एक महत्त्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटात दोन महाशक्तीशाली व्यक्तीरेखा एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत – आणि ही भिडंत इतकी तीव्र आणि थरारक आहे की ती प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली जाईल.

War 2
Wrestling star Passes Away: जगप्रसिद्ध रेसलिंग स्टार काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कियारा अ‍ॅक्शन अवतारात दिसली

'वॉर २' च्या ट्रेलरमध्ये हृतिक आणि ज्युनियर एनटीआरसह चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांची झलक दिसते. ज्यामध्ये चित्रपटाची मुख्य अभिनेत्री कियारा अडवाणी आणि आशुतोष राणा यांचा समावेश आहे. ट्रेलरमध्ये कियारा अडवाणी देखील जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. बंदूक चालवण्यापासून ते मारामारीपर्यंत, कियाराची दमदार शैली पाहायला मिळाली आहे. यावरून असे दिसून येते की चित्रपटातील कियाराचे पात्र फक्त ग्लॅमरच्या पलीकडे आहे.

हा ट्रेलर पाहिल्यानंतर हृतिक रोशन, कियारा अडवाणी आणि ज्युनियर एनटीआर यांचे चाहत्यांनी स्वतःचे अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. रेडिटवरील नेटकरी वॉर २ मध्ये कियारा अडवाणी काव्या लुथराची भूमिका साकारत असल्याचे बोलत आहेत आणि काव्या ही रॉ चे संयुक्त सचिव कर्नल सुनील लुथरा (आशुतोष राणा) यांची मुलगी आहे. यामुळे चाहते असा अंदाज लावत आहेत की काव्या लुथर शेवटी कबीरला मारायचा प्रयत्न करेन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com