बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा 'फायटर' चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित झाला. हा चित्रपट किसिंग सीनमुळे वादात सापडलाय. चित्रपटातील एका दृश्यात दीपिका आणि हृतिक हे एअरफोर्सच्या युनिफॉर्ममध्ये दिसत आहेत तेव्हा ते एकमेकांचे चुंबन घेत आहेत. (Latest News)
आसाममध्ये तैनात असलेल्या विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी या दृश्यावर आक्षेप घेतलाय. त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसह दीपिका आणि हृतिकला कायदेशीर नोटीस पाठवलीय. एअरफोर्स युनिफॉर्ममध्ये असं किस करणं चुकीचे आहे. हा युनिफॉर्मचा अपमान असल्याचं सौम्यदीप दास म्हणालेत. हवाई दलाचे युनिफॉर्म हे केवळ कापडाचा तुकडा नाही. हे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी शिस्त आणि त्यागाची निशाणी आहे, असंही दास म्हणालेत.
चित्रपटात दीपिका आणि हृतिक वायुसेनेचे जवान दाखवण्यात आले आहेत. यामुळे युनिफॉर्म परिधान करून असे कृत्य करणे चुकीचं आहे. तसेच असं केल्याने देशसेवेतील असंख्य सैनिकांच्या प्रतिष्ठेला आणि बलिदानाच्या प्रतिमेचा अपमान होत असतो. हा युनिफॉर्म एक पवित्र प्रतीक आहे, तो रोमँटिक अँगलसाठी वापरला जाऊ नये, असं करणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं सौम्यदीप दास म्हणाले.
युनिफॉर्म परिधान करत चुंबन घेणे हे बेजबाबदारपणाचं वर्तन दर्शवते. तसेच विंग कमांडरने चित्रपटाच्या निर्मात्यांना हा सीन हटवण्याची मागणी केलीय. हा सीन चित्रपटातून काढून टाकावा आणि निर्मात्यांनी संपूर्ण देशाच्या सैनिकांची माफी मागावी, असं म्हटलं आहे. चित्रपट निर्माते पुन्हा हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्मचा अपमान करणार नाहीत, असं लिहून द्यावे, अशी मागणीही त्या विंग कमांडरने केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.