
Jill Sobule Passed away: प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि गीतकार जिल सोबुले यांचे 1 मे 2025 रोजी मिनियापोलिस, मिनेसोटा येथील त्यांच्या घरी लागलेल्या आगीमुळे निधन झाले. त्या 66 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मॅनेजरने त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ही घटना त्यांच्या डेन्व्हर येथील नियोजित कार्यक्रमाच्या एक दिवस आधी घडली.
जिल सोबुले यांनी 1995 मध्ये 'I Kissed a Girl' या गाण्याद्वारे प्रसिद्धी मिळवली, हे गीत समलैंगिकतेवर आधारित पहिले पॉप गाणे आहे. हे गाणे बिलबोर्ड टॉप 20 मध्ये स्थान मिळवणारे पहिले समलैंगिक थीम असलेले गाणे होते. त्यांच्या 'Supermodel' या गाण्याला 'Clueless' या चित्रपटाच्या साउंडट्रॅकमुळेही लोकप्रियता मिळाली. त्यांनी त्यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत 12 अल्बम्स प्रदर्शित केले आणि 'F--- 7th Grade' या आत्मकथनात्मक संगीत नाटकाची निर्मिती केली, ज्याला Drama Desk नामांकन मिळाले होते.
जिल सोबुले यांचा जन्म 1959 मध्ये डेन्व्हर, कोलोराडो येथे झाला. त्यांनी त्यांच्या संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकेल. त्यांच्या अनेक गाण्यांना भारतातही पसंत केले जाते. 2002 मध्ये त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत स्वतःला उभयलिंगी असल्याचे जाहीर केले. 2009 मध्ये त्यांनी 'California Years' अल्बमसाठी 75,000 डॉलर्सचा निधी गोळा करून क्राउडफंडिंगद्वारे कॉन्सर्ट केला.
त्यांच्या निधनामुळे संगीत आणि LGBTQ+ समुदायात शोककळा पसरली आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भाऊ जेम्स, वहिनी मेरी एलेन आणि तीन पुतणे आहेत. त्यांच्या सन्मानार्थ एक औपचारिक श्रद्धांजली सभा या आयोजित केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.