
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam: ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारखे हिट चित्रपट देणारे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने महाराष्ट्र दिनानिमित्ताने त्यांच्या ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी या निर्मिती संस्थेचा हा पाचवा सिनेमा असणार आहे तर आनंद एल राय यांच्या कलर यल्लो प्रॅाडक्शन सोबत त्यांचा सलग तिसरा चित्रपट असणार आहे.
मराठी शाळांमधील शिक्षणपद्धती, मातृभाषेत शिकण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट मनोरंजन करताना विचार करायला लावणारा ठरेल. शिक्षण क्षेत्रातील बदल, मराठी शाळांची कमी होणारी संख्या आणि मातृभाषेच्या माध्यमातून होणाऱ्या जडणघडणीवर हा चित्रपट प्रकाश टाकणार आहे.
हेमंत ढोमेने याआधी ‘झिम्मा’, झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे संवेदनशील विषय मनोरंजनाच्या माध्यमातुन अत्यंत प्रभावीपणे मांडल्या होत्या. आता ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ हा एक वेगळा सामाजिक विषय प्रेक्षकांसाठी ते घेऊन येत आहेत.
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, “मराठी माध्यमातून मिळालेलं शिक्षण हे माझं बळ ठरलं, अडथळा नाही. मातृभाषेत शिकल्यामुळे मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली आणि याच जडणघडणीचा अभिमान मी जगभर मिरवू शकलो. आपल्या मातीत रुजावं आणि आभाळाला भिडावं!आज मी जो काही आहे, तो माझ्या मराठी शाळांमुळेच आहे. माझे शालेय शिक्षण हे रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी एकूण आठ मराठी शाळांमधून झाल. ज्यात जिल्हा परिषद शाळा देखील होत्या ज्याचा मला प्रचंड अभिमान आहे. परंतू आजकाल मराठी शाळा बंद पडत आहेत, त्यांची पट संख्या खालावत आहे ही चिंतेची बाब असून या चित्रपटातून मातृभाषेतील शिक्षण हे कमीपणाचं नसून, खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं असतं हे अधोरेखित करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.