Shruti Kadam
१ मे हा केवळ कामगार दिनच नाही तर महाराष्ट्र दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो.
१०६ हुतात्म्यांच्या बलिदानाने १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली.
२१ नोव्हेंबर १९५६ रोजी बॉम्बे म्हणजेच आत्ताच्या मुंबईमधील मराठी माणसांचा जनसमुदाय फ्लोरा फाउंटन येथे जमला.
राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारल्यामुळे मराठी माणसे प्रचंड चिडली होती. सर्वत्र छोट्या-मोठ्या सभांमधून आयोगाच्या या निर्णयाचा निषेध केला जात होता.
कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात येण्याचे ठरले.
या मोर्चावर पोलिसांनी आधी लाठीचार्ज केला पण ते जुमानले नाही म्हणून मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबाराचे आदेश दिले.
या गोळीबारात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १०६ आंदोलक मृत्युमुखी पडून शाहिद झाले.
या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या तीव्र आंदोलनामुळे सरकारने अखेर १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.