Justin Bieber: जस्टिन बीबर-हॅलीने चाहत्यांना दिली गोड बातमी; प्रसिद्ध जोडप्याच्या घरात नव्या पाहुण्याची एन्ट्री

Justin Bieber and Hailey Bieber Became Parents: जस्टिन बीबर आणि हॅली बीबर यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. जस्टिने सोशल मीडिया पोस्टद्ववारे चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
Justin Bieber and Hailey Bieber Became Parents
Justin Biebercanva
Published On

हॉलिवूड गायक जस्टिन बीबर आणि त्याची पत्नी हॅली बीबर यांच्या आयुष्याच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. जस्टिन आणि हॅलीच्या लग्नाला ६ वर्ष झाली आहेत. लग्नाच्या सहा वर्षानंतर या जोडप्यानं लहान गोंडस बाळाला जन्म दिला आहे. शनिवारी दिनांक २४ ऑगस्ट रोजी गायकाने त्याच्ये सोशल मीडियावर एक पोस्टसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. जस्टिनने १० मे रोजी त्याच्या पत्नीच्या गर्भधारणेची घोषणा सोशल मीडिया पोस्ट द्वारे केली होती. जस्टिनने पोस्ट केलेल्या व्हिडिओ आणि फोटोमद्ये हॅली पांढऱ्या गाउनमध्ये तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली होती.

Justin Bieber and Hailey Bieber Became Parents
Anant Radhika Wedding : अनंत- राधिकाच्या लग्न संगीत समारंभात कोणकोणते सेलिब्रिटी करणार परफॉर्मन्स ? पाहा लिस्ट

जस्टिन आणि हॅलीच्या पालक होण्याच्या बातमीमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडालेली पाहायला मिळाली होती. जस्टिन आणि हॅलीने त्यांच्या प्रेग्नंसीच्या काळातील सर्व अपडेट चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत होते. आज दिनांक २४ ऑगस्ट रोजी दोघेही आई वडील झाले आहेत. हॅली बीबरने एका गोंडस बाळाला जन्म देत दोघांच्या आयुष्यात आनंदाचा पाऊस पाडला आहे. बाळाच्या पायाचा फोटो जस्टिनने त्याच्या इन्सटाग्रामवर शेअर केला आहे.

जस्टिनने बाळाचे नाव जॅक ब्लूज बीबर असे ठेवले आहे. जस्टिनने ‘जॅक ब्लूज बीबरचे घरी स्वागत आहे’ असं कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. जस्टिन आणि हॅलीला अनेक अभिनेत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे. त्यासोबत अनेक नेटकऱ्यांनी सुद्धा बाळाला आशर्वाद दिले आहेत.

जस्टिन बीबर आणि हॅली यांचं २०१९मध्ये लग्न झालं होतं. हॅली आणि जस्टिन दीर्घकाळापासून प्रेमबंधनात होते. जस्टिन बीबर आणि हॅली यांच्या ग्रँड वेडिंग फंक्शन आयोजीत करम्यात आलं होतं. आता दोघांच्या आयुष्याला एक नवं वळण आलं आहे.मागिल महिन्यात आनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नामध्ये जस्टिन बीबरने हाजेरी लावली होती. लग्नासंमारंभा दरम्यान जस्टिननं त्याच्या गाण्यांमुळे अनेकांच्या मनावर राज्य केलं. जस्टिनच्या गाण्यांना लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीचं पसंती मिळते. जस्टिनने दिलेल्या गोड बातमीमुळे त्याच्या चाहात्यंमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Edited By: Nirmiti Rasal

Justin Bieber and Hailey Bieber Became Parents
Justin Bieber And Badshah Fee : जस्टिन बीबर की बादशाह ; अनंत- राधिकाच्या संगीत सोहळ्यात सर्वाधिक मानधन कोणी घेतलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com