Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंच्या बिग बॉसमधील प्रवासाला ब्रेक, नेमकं काय घडलं?

Gunaratna Sadavarte : बिग बॉसमध्ये पहिल्या दिवसापासून सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. या मागचे नेमकं कारण काय जाणून घ्या.
Gunaratna Sadavarte
Bigg Boss 18SAAM TV
Published On

बिग बॉस 18 (Bigg Boss 18 ) आता दिवसेंदिवस जास्त मनोरंजक होत जात आहे. घरातील सदस्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. यात वकील गुणरत्न सदावर्ते यांचा पहिला नंबर आहे. मात्र आता प्रेक्षकांना काही दिवस गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांची कमी भासणार आहे. कारण गुणरत्न सदावर्ते हे घराबाहेर पडल्याचे बोले जात आहे.

सध्या सर्वत्र गुणरत्न सदावर्ते हे घराबाहेर पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. उच्च न्यायालयात एक केस प्रलंबित असल्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना मध्येच बिग बॉसच घर सोडाव लागत आहे. कारण ही केस सुरु असताना सदावर्ते हे घरात आले होते. त्यामुळे केस सुरु असताना तुम्ही बिग बॉसच्या घरात कसे जाऊ शकता असे म्हणत हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. केस संपल्यावर गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा बिग बॉसच्या घरात जातील असे बोले जात आहे.

गुणरत्न सदावर्ते यांची हायकोर्टात मराठा आरक्षणाची केस सुरु आहे. अशात ते कोर्टात अनुपस्थिती राहिल्यामुळे हायकोर्टात प्रश्न निमार्ण झाला. केस सोडून गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसच्या घरात गेल्यामुळे हायकोर्टाने त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या बिग बॉसमधील अचानक एक्झिटमुळे चाहते मात्र नाराज झाले आहेत. कारण बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्ते यांच्याशिवाय मनोरंजन अशक्य आहे, असे सर्वत्र बोले जात आहे. नेटकरी गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा बिग बॉसच्या घरात येण्याची वाट पाहत आहेत. आता सदावर्ते यांच्या एक्झिटनंतर बिग बॉसच्या घरात नवीन काय राडा होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Gunaratna Sadavarte
Bigg Boss 18: सलमानला किस करत 'मर्डर गर्ल' म्हणाली,'हमारा वो वाला व्हिडीओ..'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com