Govinda: गोविंदा झाला कंगाल, पैशांसाठी करतोय शाळांमध्ये डान्स? मॅनेजरनेच सांगतली खरी कहाणी

Govinda: गोविंदा अलीकडेच एका महाविद्यालयीन आणि खाजगी कार्यक्रमात नाचताना दिसला. त्यानंतर साधी कार चालवताना दिसला त्यामुळे तो कंगाल झाला अशा अफवा सुरु झाला.
Govinda
GovindaSaam tv
Published On

Govinda: सोशल मीडियावर गेल्या काही काळापासून गोविंदाबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. गेल्या एक वर्षापासून त्याच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असल्याच्या अफवा पसरत आहेत आणि आता त्याच्या दिवाळखोरीच्या अफवाही समोर येऊ लागल्या आहेत. अलिकडेच, जेव्हा गोविंदा खाजगी कार्यक्रमांमध्ये आणि एका कॉलेजच्या कार्यक्रमात नाचताना दिसला तेव्हा तो दिवाळखोर झाला आहे आणि त्याला पैशांची गरज असल्याने तो अशा कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करत आहे अशा अफवा पसरल्या. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गोविंदाच्या दिवाळखोरीच्या अफवा खोट्या असल्याचे सांगून फेटाळून लावले. त्यांनी त्या काळाची आठवणही करून दिली जेव्हा अभिनेत्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि त्याचे घर गहाण ठेवावे लागले.

अलीकडेच, गोविंदाचा एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये तो उत्तर प्रदेशात एका साध्या टॅक्सीमध्ये जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यामुळे नेटकऱ्यानी याला गोविंदाबद्दल म्हटले की एकेकाळी बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ चालवणारा स्टार आता साध्या गाडीतून फिरत आहे अशा प्रकारच्या अनेक कमेंट केल्या आहेत.

Govinda
Mrunal Thakur: काय बोली राह्यली! अहिराणीचा गोडवा अन् मृणाल ठाकूरचा ठसकेबाज अंदाज; नेटकऱ्यांची जिंकली मन, पाहा VIDEO

त्याच्याकडे अनेक गाड्या आहेत, पण तो दिवाळखोर नाही...

गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा म्हणाले की, गोविंदाचे खाजगी कार्यक्रम आणि शाळांमधील डान्स आणि कारमधून साधे प्रवास करणे याचा आर्थिक अडचणींशी काहीही संबंध नाही. त्यांनी एएनआयला सांगितले, "गोविंदाकडे फक्त एक नाही तर अनेक गाड्या आहेत. तो दिवाळखोर आहे आणि भिक्षा मागतो असे म्हणणे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे. कार्यक्रमात नाचणे हा त्याचा व्यवसायाचा भाग आहे. याचा अर्थ असा नाही की तो दिवाळखोर आहे. त्यावेळी विमानतळावर खाजगी वाहनांना परवानगी नव्हती.

Govinda
Elvish Yadav: 'मला माझं प्रेम मिळालं...'; एल्विश यादवने 'या' अभिनेत्रीसोबत केला साखरपुडा, खास पोस्ट करुन दिली गुड न्यूज

अभिनेते आणि निर्माते गोविंदाच्या मागे लागले आहेत...

शशी सिन्हा पुढे म्हणाले की, गोविंदाने अनेक वर्षांपासून चित्रपटात काम केले नसले तरी, केवळ कार्यक्रम आणि नृत्य सादरीकरणासाठीच नव्हे तर चित्रपटांसाठीही त्याला मोठी मागणी आहे. मी या गोष्टीचा साक्षीदार आहे की त्याने करोडो रुपयांच्या ऑफर्स नाकारल्या आहेत. मोठे निर्माते आणि कलाकार अजूनही त्याला ऑफर देतात. याचा अर्थ असा नाही की त्याने काम करणे थांबवले आहे. लवकरच तुम्हाला एक मोठी घोषणा ऐकायला मिळेल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com