हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारा बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi ) आजही त्याच्या रोमँटिक अंदाजासाठी ओळखला जातो. सध्या इमरान त्याच्या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. त्याचा 'गनमास्टर जी९' (Gun Maaster G9 Teaser) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशात चित्रपटाचा नुकत्याच टिझर रिलीज करण्यात आला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.'गनमास्टर जी९' मध्ये इमरान हाश्मीसह बॉलिवूड अभिनेत्री जिनिलीया (Genelia ) देशमुख झळकणार आहे.
इमरान हाश्मी आणि जिनिलीयाला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच यांच्यासोबत चित्रपटात अपारशक्ती खुराना देखील दिसणार आहे. चित्रपटाचा निर्माता दिपक मुकुट यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर धमाकेदार टीझर शेअर केला आहे. या टीझरला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "दूध से बारूद, सब्जी से गुंडा, गोलियों से मारना है, गनमास्टर जी9 तबाही के लिए तैयार हो रहा है, और टीम तैयार, लोडेड और घातक है!"
'गनमास्टर जी९' चित्रपटाचा टीझर तीन भागांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. पहिल्या भागात टीझरची सुरूवात इमरानच्या "मुझसे मच मच किया, चलेगा... गलती से फैमिली को टच किया तो याद रखना, "धंधे से दूध वाला हूं, बंदा बारूद वाला हूं." या धडाकेबाज डायलॉगने होते. यामध्ये तो हातात बंदूक घेऊन दुधाने भरलेल्या बादली मधून त्याचा हात बाहेर काढताना दिसत आहे. त्याच्या हातात रूद्राक्षाची माळ, हातावर शिवलिंग आणि नंदीबैलाचा टॅटू दिसत आहे.
टीझरच्या दुसऱ्या भागामध्ये जिनिलीया देशमुख बांगड्यांनी भरलेल्या हातात सूरा घेऊन दुधाच्या बादलीमधून हात बाहेर काढत म्हणते की, "घर की बहू हूं, इसका ये मतलब नहीं कि सिर्फ निर्मल और शीतल हूं... घर पर सब्जी आएगी तो सब्जी काटुंगी लेकिन अगर घर पर गुंडे-बदमाश आए तो, सब्जी थोड़ी काटूंगी."
टीझरच्या तिसऱ्या भागामध्ये अपारशक्ती खुरानाचा हात पाहायला मिळत आहे. तो म्हणतो की, "लोहे की कांटी, दे सुराठी. हाथ में है बम. गुड़गांव में लोग हमसे 70 फीट दूर रहते हैं... क्योंकि बम और हम कभी भी फट सकते हैं." असं म्हणत हातात बॉम्ब घेऊन दुधाने भरलेल्या बादली मधून त्याचा हात बाहेर येताना दिसत आहे.
'गनमास्टर जी९' चित्रपट नवीन वर्षात 2026ला रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त यांनी केले आहे. 'गनमास्टर जी९' हा ॲक्शन ड्रामा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.