Gaurav Khanna: 'ती माझी पत्नी आहे...'; सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चांना गौरव खन्नाचे सडेतोड उत्तर

Gaurav Khanna: आकांक्षा चमोलाच्या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर गौरव खन्नाने अखेर मौन सोडले. अफवांना पूर्णविराम देत त्याने त्यांच्या नात्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
gaurav khanna breaks silence on akansha chamola
gaurav khanna breaks silence on akansha chamolaSaam Tv
Published On

Gaurav Khanna: अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी अभिनेत्री आकांक्षा चमोला यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत. नेटफ्लिक्सच्या लॉक अप या शोमध्ये आकांक्षा चमोलाने घटस्फोटाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आले. आता या सर्व चर्चांवर गौरव खन्नाने प्रथमच प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

'लॉक अप' या कार्यक्रमात आकांक्षा चमोलाने, "जर मी या शोमध्ये जास्त दिवस राहिले, तर बाहेर पडल्यानंतर माझा घटस्फोट झालेला असेल," असे वक्तव्य केले होते. तिच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना वेग आला.

gaurav khanna breaks silence on akansha chamola
Director Death: मराठी रंगभूमीवरील तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ दिग्दर्शिका काळाच्या पडद्याआड, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

या अफवांवर अखेर गौरव खन्नाने मौन सोडले. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, 'खरं सांगायचं तर, परिस्थिती अगदी पूर्वीसारखीच आहे. आमचं प्रेम अजूनही तितकंच घट्ट आहे आणि मी नेहमीच आकांक्षाला पाठिंबा देत राहीन शेवटी ती माझी पत्नी आहे. तिच्यावर प्रेम केल्यानंतर मी माघार का घेईन?

gaurav khanna breaks silence on akansha chamola
Toxic : यशच्या 'टॉक्सिक'मध्ये ग्लॅमरचा तडका; नयनतारा, कियारासह पाच अभिनेत्रींची दमदार एंट्री

गौरव आणि आकांक्षा यांचे लग्न २०१६ मध्ये झाले. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्या नात्यात कोणताही तणाव नसल्याचे चाहतेही सांगत आहेत. गौरवच्या या स्पष्टीकरणानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com