Sonalee Kulkarni: कलाकारांमध्ये दडलेला कलाकार; सोनालीने गणरायाची मूर्ती कशी घडवली? पाहा व्हिडीओ

Ganeshotsav 2023: सोनालीने यंदा स्वत:च्या हाताने शाडू मातीची गणपती मूर्ती बनवली आहे.
Sonalee Kulkarni
Sonalee KulkarniSaam TV

Sonalee Kulkarni:

गणेशोत्सवात मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होत असते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी देखील सालाबादप्रमाणे यंदाही गणरायाचे आगमन होणार आहे. यासासठी सोनालीने यंदा स्वत:च्या हाताने शाडू मातीची गणपती मूर्ती बनवली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. (Marathi Actress Latest News)

Sonalee Kulkarni
Actress Welcome Baby Girl: आमच्या आनंदी प्रवासाची सुरुवात... अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचे आगमन

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने यंदाही शाडू मातीचा गणपती बाप्पा स्वतःच्या हाताने बनवलाय. यावर्षी तीने खास संत तुकाराम महाराज यांच्या वेशातील गणपती बाप्पा बनवला आहे. मूर्ती बनवतानाचे फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,"यंदाचा गणेशोत्सव खूप भावनिक आहे. यंदाची मूर्ती खूप खास आहे. का आणि कोणती …? ते पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा माझ्या युट्यू चॅनलला, असं सोनालीने लिहिलं आहे.

सोनाली कुलकर्णी दरवर्षी पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करत असते. यंदाही तिने शाडू माती, कागदाचा लगदा,पाणी आणि नैसर्गिक रंग वापरून हा गणपती बाप्पा साकारला आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी ती बाप्पाची स्थापना पिंपरी चिंचवड शहरातील तिच्या निवासस्थानी करणार आहे.

सोनालीने मनोरंजन विश्वात मोठं नाव कमावलं आहे. ती प्रत्येक पात्राला पूर्णपणे न्याय देते. आजवर सोनालीने मराठीसह बॉलिवूडमध्येही दमदार अभिनय केला आहे. गणपती मूर्ती बनवतानाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेत. यावर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय.

रवी जाधव यांनी देखील घरीच आपल्या हाताने मूर्ती घडवली आहे. "अनेक वर्षे झाली आम्ही घरातच बाप्पांची छोटीशी मूर्ती तयार करतो. या वर्षी त्यात एक छोटासा बदल केलाय. मूर्तीचा एक साचा ऑनलाईन मिळाला. त्यात शाडूची माती भरुन एक सुबक मुर्ती तयार झाली. आता त्यावर थोडे बारीक फाईन ट्युनिंग सुरु आहे. त्यानंतर रंगकाम. ते झाल्यावर नक्कीच शेअर करीन." असं पोस्ट शेअर करत रवी जाधव यांनी म्हटलं आहे.

Sonalee Kulkarni
Sonalee Kulkarni: 'अप्सरा'ने कोणत्या विषयात घेतलीय मास्टर्सची डिग्री

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com