Sonalee Kulkarni: 'अप्सरा'ने कोणत्या विषयात घेतलीय मास्टर्सची डिग्री

Shraddha Thik

अप्सरा

मराठी मनोरंजन विश्वामध्ये सोनाली कुलकर्णीने अप्सरा अशी स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

जन्म पुणे

सोनालीचा जन्म पुण्याच्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये झाला. तिचे वडील मनोहर कुलकर्णी लष्करात डॉक्टर होते आणि आईही लष्करातच नोकरी करत होती.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

आर्मी स्कूल

सोनालीच्या वडिलांनी भारतीय लष्करात 30 वर्षे काम केलं. सोनालीचं शिक्षण आर्मी स्कूल, केंद्रीय विद्यालयातून झाले.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

फर्ग्युसन कॉलेज

त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये तिनं प्रवेश घेतला. मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या विषयात सोनालीनं पदवी घेतली.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

पोस्ट ग्रॅज्युएशन

इतकंच नाही तर तिनं इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन या संस्थेतून रेडिओ, टेलिव्हिजन अँड फिल्म प्रॉडक्शनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन देखील केलं आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

अभिनयाची आवड

सोनालीला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

उत्कृष्ट मॉडेल

फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपण एक उत्कृष्ट मॉडेल होऊ शकतो, असं तिला वाटले. 2005 मध्ये सोनालीनं सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि त्यात ती फस्ट रनरअप ठरली.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

Next : Reasons Of Business Closures | व्यवसाय बंद होण्याची प्रमुख कारणं कोणती? जाणून घ्या

Reasons Of Business Closures | Saam Tv