Galwan Ghati New Film: पुन्हा गुंजणार भारतीय शूरवीरांची कहाणी, भारत-चीनचा सीमावाद रुपेरी पडद्यावर; अपूर्व लाखिया करणार दिग्दर्शन...

जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात सीमेवरून बऱ्याच प्रमाणात वाद निर्माण झाला होता. हाच वाद आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे.
Galwan Ghati New Film Announcement
Galwan Ghati New Film AnnouncementSaam Tv

Galwan Ghati New Film Announcement:भारत आणि शेजारील राष्ट्राच्या सीमाभागावर अनेकदा चकमक होते. भारत- चीनचा गलवान खोऱ्यातील भाग नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात सीमेवरून बऱ्याच प्रमाणात वाद निर्माण झाला होता. हाच वाद आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे.

Galwan Ghati New Film Announcement
Filmfare Award Nomination: २०२२ मधील या चित्रपटांना मिळाले आहे यंदाचे फिल्मफेयरचे नॉमिनेशन

जून २०२० मध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये आपापसात चकमक झाली होती. या आपापसातील चकमकीत कर्नल संतोष बाबू यांच्यासोबत भारतीय २० जवान शहीद झाले होते. तर चीनचे ३८ पेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते. या घटनेमुळे भारताच्या राजकारणासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण देखील बरेच ढवळून निघाले होते.

सोबतच चीन्यांना अद्दल घडावी यासाठी भारतात अनेक चिनी ॲप्सवर बंदी घातली होती. आजही या घटनेचा भारतीयांकडून तीव्र निषेध केला जातो. लवकरच ही सर्व घटना भारतीय प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक अपूर्व लाखिया या घटनेवर चित्रपट बनवणार आहेत. (Bollywood Film)

Galwan Ghati New Film Announcement
Mia Khalifa Divorce: एका वर्षातच मोडलं मिया खलिफाचं दुसरं लग्न; प्रतिक्रिया देत म्हणते, माझा नवरा....

चित्रपट ॲनालिस्ट आणि समीक्षक तरण आदर्श यांनी चित्रपटाची घोषणा झाली असल्याची माहिती दिली आहे. ही पोस्ट पाहिल्यावर आपल्याला अपूर्व लाखिया भारतीय लष्कराची शौर्य गाथा दाखवण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

चित्रपटाची कथा गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर लिहिलेल्या ‘इंडियाज मोस्ट फिअरलेस 3’ या पुस्तकातून घेण्यात आली आहे. भारतीय सैनिक आणि चिनी सैनिक यांच्यातील चकमकीतील संघर्षावर हे पुस्तक आधरलेले आहे. या पुस्तकाचे लेखक पत्रकार शिव आरुर आणि राहुल सिंग आहे. (Bollywood Actor)

Galwan Ghati New Film Announcement
सपनाची The Kapil Sharma Showमध्ये रिएन्ट्री; कृष्णा अभिषेकचा सेटवरील व्हिडिओ व्हायरल

चित्रपटाची कथा सुरेश नायर आणि चिंतन गांधी हे दोघे संपूर्णपणे वेगळ्या पद्धतीने लिहिणार आहेत. तर चित्रपटाच्या संवादाची जबाबदारी चिंतन शाह यांच्याकडे आहे. चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार अद्याप याची माहिती गुलदस्त्यात आहे.

भारतावर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवर हा पहिला चित्रपट नसून आतापर्यंत अनेक चित्रपट झाले आहेत. भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धावरील आपण अनेक चित्रपट पाहिले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अजय देवगणने देखील गलवान खोऱ्यातील संघर्षावर चित्रपट बनवणार याबद्दल बोलला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com