कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या मुलीवर चित्रपट; नेटफ्लिक्सने दिले लाखो डॉलर

एक दिवस ती अमेरिकेत शिरली आणि तिथल्या बड्या श्रीमंत, शक्तिशाली लोकांची तिने करोडोंची फसवणूक केली.
Inventing Anna Netflix Series
Inventing Anna Netflix SeriesSaam TV
Published On: 

अ‍ॅना डेल्वी उर्फ ​अ‍ॅना सोरोकिनची (Anna Sorokin) कथा एखाद्या थ्रिलर कादंबरीच्या कथानकापेक्षा कमी नाही. 1991 मध्ये दक्षिण मॉस्कोमधील एका मध्यम वर्गीय कामगार कुटुंबात जन्मलेली, नैन-नक्ष यांची अतीशय हुशार डोक्याची मुलगी. वडील ट्रक ड्रायव्हर आणि आई छोटेसे जनरल स्टोअर चालवायची. नंतर पुढे तीची आई पूर्णवेळ गृहिणी बनली. तिच्या जीवनावर चित्रपट बनवण्यासाठी नेटफ्लिक्सने तिला तीन लाख 20 हजार डॉलर्स दिले आहेत. (Inventing Anna Netflix Series)

ज्या मुलीचे आयुष्य अत्यंत गरिबीत, अत्यंत सामान्य घरात व्यतीत झाले, जी बालपणी शिक्षकांशी बोलतांनाही घाबरायची. एक दिवस ती अमेरिकेत शिरली आणि तिथल्या बड्या श्रीमंत, शक्तिशाली लोकांची तिने करोडोंची फसवणूक केली. तिने सर्वांना असा विश्वास दिला की ती अतिशय श्रिमंत कुटुंबांतून आहे. नम्रता तिच्या रक्तात आहे, ती स्वत: एक चलती-फिरती रॉयल्टी आहे असे तिने लोकांना पटवून दिले होते. स्वत:ला हुशार समजणाऱ्या अनेक बुद्धीमान लोकांना तिने वेड लावले होते.

Inventing Anna Netflix Series
Inventing Anna Netflix SeriesSaam TV

'प्रत्येक सुनावणीला नवीन कपडे'

मग एके दिवशी त्या मुलीवर जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या कोर्टात करोडोंच्या फसवणुकीचा खटला चालवला गेला. त्या प्रकरणाचा तपशील इतका रंजक आहे की त्यावर एक सुंदर कथा तयार होऊ शकते. अ‍ॅना तिच्या कपड्यांबद्दल आणि फॅशनबद्दल इतकी काळजी घेत होती की तिने तिच्या वकिलाला तिच्यासाठी एक खास प्रसिद्ध असा फॅशन डिझायनर ठेवण्यास सांगितले होते, जो प्रत्येक सुनावणीपूर्वी तिच्यासाठी खास फॅशनेबल पोशाख तयार करेल. न्यायमूर्तींनी एकदा न्यायालयात सांगितले की अ‍ॅना सोरोकिनला खटल्यापेक्षा तिच्या कपड्यांची आणि फॅशनची जास्त काळजी वाटते.

अ‍ॅना सोरोकिनच्या खिशात जेव्हा फुटकी कौडी नव्हती तेव्हा तिने न्यूयॉर्कमधील अनेक कलाकार, फॅशन डिझायनर, समाजवादी लोकं त्याचबरोबर बडे-बडे उद्योजक, बँकांना सांगितले होते की ती जर्मीनीच्या एका अरबपतीच्या करोडोंच्या संपत्तीची एकमेव मालकीण आहे.

Inventing Anna Netflix Series
Inventing Anna Netflix SeriesSaam TV

13 भाषा अवगत असलेली आरोपी

अ‍ॅना जेव्हा 15 वर्षांची होती, तेव्हा तिचे कुटुंब मॉस्कोहून जर्मनीला गेले, जिथे तिने तिचे शालेय शिक्षण पुर्ण केले. अ‍ॅना अभ्यासात सरासरी असले तरी डोक्यानं अतिशय फास्ट होती. तिला जगातील 13 भाषा अवगत होत्या. तिचं डोकं इतकं तेज होतं की एकदा काही वाचले की ते कायम लक्षात राहील. लोकांवर प्रभाव पाडून त्यांना आपल्याकडे आकर्षीत करण्याची कला तिला चांगलीच अवगत होती. म्हणूनच तर तिच्या खोट्या गोष्टींवर इतक्या लोकांचा विश्वास बसला. तुम्ही एकावेळी दोन किंवा दहा लोकांना तुमचे खोटे पटवून देऊ शकता, मूर्ख बनवू शकता, परंतु न्यूयॉर्कच्या अर्ध्या लोकांना नाही. आणि तेही सामान्य मध्यमवर्गीय लोक नाहीत, तर सर्वात सक्षम, हुशार आणि शक्तिशाली लोक.

60 दशलक्ष डॉलरचा ट्रस्ट

न्यूयॉर्कला जाण्यापूर्वी अ‍ॅनानं लंडन आणि पॅरिसमध्ये काही काळ घालवला होता. पॅरिसमधील एका फॅशन मॅगझिनमध्येही तिने काही काळ काम केले, पण न्यूयॉर्कला गेल्यावर तिला पहिल्यांदा वाटले की इथल्या लोकांशी मैत्री करणे सोपे आहे. तिने न्यूयॉर्कमधील लोकांना आपलं खोटं पटवून देण्यासाठी जर्मनीमध्ये आपल्या नावावर 60 दशलक्ष डॉलरचा ट्रस्ट असल्याचे सांगितले होते. तिला त्या काळात वाटले की राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी न्यूयॉर्क चांगलं शहर आहे. ती जर युरोपातचं राहिली असती तर तिच्या हा खोट्या गोष्टींना कोणी भीक घातली नसती.

वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या वास्तुविशारदाला गंडा

न्यूयॉर्कमध्ये आर्ट हाउस क्लब उघडण्याच्या नावाखाली अ‍ॅना सोरोकिनने अनेक श्रीमंत लोकांना फसवले. आपापल्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट लोक तिच्यासोबत काम करण्यासाठी तयार झाले. त्यामध्ये एक वास्तुविशारद व्यक्ती होती. ज्याच्या कुटुंबाने वर्ल्ड ट्रेड सेंटरसाठी वास्तुविशारद म्हणून भूमिका पार पाडली होती. 60 दशलक्ष डॉलर्सची मालकीण असलेल्या अ‍ॅना डेलवी ज्यावेळी 25 वर्षांची होईल त्यावेळी 60 दशलक्ष डॉलरचा असलेला ट्रस्ट तिच्या नावावर होईल. या विश्वासावर तिने अ‍ॅनावरती अनेक बड्या लोकांनी आपले पैसे खर्च केले. या विश्वासावर सर्वांनी तिच्यावर पैसे लावले आणि अ‍ॅनाने त्यातला एक रुपयाही परत दिला नाही.

अ‍ॅनाने हा फसवणूकीचा खेळ बराच काळ चालवला, पण एके दिवशी त्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला. अ‍ॅनाची फसवणूक उघडकीस आल्यानंतर तिच्यावर न्यूयॉर्कच्या न्यायालयात खटला चालवण्यात आला. जेव्हा खटल्याची पहिली बातमी आली तेव्हा न्यूयॉर्क मासिकाच्या पत्रकार जेसिका प्रेसलरला वाटले की या मुलीच्या कथा काहीतरी रंजक आहे.

जेसिकाने अ‍ॅना सोरोकिनची कथा शोधायला सुरुवात केली. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर आणि शेकडो मुलाखतीनंतर, न्यूयॉर्क मॅगझिनमध्ये ही कथा दिसली - "हाउ अन्‍ना डेल्‍वी ट्रिक्‍ड न्‍यूयॉर्क पार्टी पीपल" नेटफ्लिक्सची सिरीज 'इनव्हेंटिंग' ही अ‍ॅनाच्या कथेवर आधारित आहे. अ‍ॅनाच्या जीवनावरती सिरीज बनवण्यासाठी नेटफ्लिक्सने तिला तीन लाख 20 हजार डॉलर्स दिले, ज्यातील एक मोठा भाग तिला त्या लोकांकडे परत करावा लागला ज्यांची तिने हजारो डॉलर्सची फसवणूक केली होती.अ‍ॅना सध्या न्यूयॉर्कच्या तुरुंगात आहेत. अमेरिका तिला जर्मनीला पाठवण्याच्या तयारीत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.