Abir Gulal: पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा 'अबीर-गुलाल' उधळून लावणार, राज ठाकरेंची मनसे आक्रमक

Abir Gulal Movie Controversy: पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या 'अबीर गुलाल' या नवीन चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. राज ठाकरे यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा इशारा दिला आहे.
Abir Gulal Movie Controversy
Abir Gulal Movie ControversySaam Tv
Published On

Abir Gulal Movie Controversy: ८ वर्षांनंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान 'अबीर गुलाल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. या अभिनेत्याला त्याच्या चित्रपटांसाठी भारतात खूप प्रेम मिळाले आहे. तो बराच काळ हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर होता, पण अलीकडेच 'अबीर गुलाल'च्या घोषणेमुळे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्साहित झाले होते. १ एप्रिल रोजी 'अबीर गुलाल' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर फवाद खानचे चाहते आनंदात होते, तर त्यावरून वादही सुरू झाला आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेचा आक्षेप

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच महाराष्ट्रात त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मनसे सिनेमा शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ते महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाहीत कारण त्यात एक पाकिस्तानी कलाकार काम करत आहे.

Abir Gulal Movie Controversy
kunal kamra: 'एखाद्या कलाकाराची...' कुणाल कामराने पुन्हा साधला सरकारवर निशाणा; लोकशाहीचा उल्लेख करत म्हणाला...

चित्रपटावर बंदी घालण्यासाठी सरकारकडे आवाहन केले? मिड डेच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाबद्दल माहिती मिळाली. मनसेने म्हटले आहे की, हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होणार नाही. याप्रकरणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, "पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी द्यायची की नाही हा निर्णय सरकारने घेतला पाहिजे."

Abir Gulal Movie Controversy
Kavi Kalash: 'ओ छत्रपती, ओ सहचर संभा'; औरंगजेबासमोर कैद कवी कलशांची 'ती' शेवटची कविता शंभूराजांसाठी, एकदा नक्की वाचा

चित्रपटाची रिलीज तारीख

चित्रपटाच्या टीझरमध्ये फवाद खान गाडी चालवत असताना एक जुने गाणे गुणगुणताना दिसत आहे, ज्याचा आनंद वाणी कपूर घेत आहे. टीझरमध्ये दोघांमधील केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. 'अबीर गुलाल' हा चित्रपट ९ मे २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये फवाद खान आणि वाणी कपूर व्यतिरिक्त रिद्धी डोगरा, लिसा हेडन, फरीदा जलाल आणि सोनी राजदान सारखे कलाकार दिसतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com