गेल्या अनेक दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीमध्ये भारतीय सैन्याची शौर्यगाथा दाखवणाऱ्या चित्रपटांची घोषणा केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘बटालियन ५०’, ‘फौज - द मराठा बटालियन’ सारख्या चित्रपटांची घोषणा करण्यात आली. अशातच ‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा पोस्टर शेअर करत चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
१९७१ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या महत्वपूर्ण युद्धाची कथा आपल्याला चित्रपटातून पाहयला मिळणार आहे. या युद्धाची आजही चर्चा होते. हे युद्ध इतिहासातील एक महत्वाचे युद्ध ठरले. कारण या युद्धामध्ये भारताच्या विजयी झेंड्याची घोषणा करण्यात आली तसेच बांग्लादेश या नवीन देशाची स्थापनाही झाली. या सगळ्यात बलिदान दिलेल्या शूरवीर सैनिकांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून दिसणार आहे. (Marathi Film)
“ मी यापूर्वी युद्ध परिस्थितीवर आधारलेले चित्रपट केले आहेत. त्यामुळे मला अशा कथा विशेष भावतात. हे पडद्यावर साकारणे जरा जड जाते मात्र निर्माते, कलाकार, इतर टीमच्या साथीने हा प्रवास सोपा होतो. इतिहासात अनेक लढाया आणि युद्धे झाली आहेत. पण या युद्धामध्ये महत्वपूर्ण घटना घडली. अंगावर शहारा आणणारी ही लढाई आजवरची सर्वात मोठी रक्तरंजित लढाई ठरली होती.”
“या लढाईमध्ये, पाकिस्तानचे दोन भाग झाले. ही लढाई निश्चितच सोपी नव्हती. भारतीय सैन्यांची हीच शौर्यगाथा पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या निमित्ताने इतिहास पुन्हा जागवण्याचाही आम्ही प्रयत्न केला आहे. या सगळ्यात मला भूषण मंजुळे यांची कथा, पटकथा लाभल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना अधिकच वास्तववादी वाटेल.” अशी प्रतिक्रिया चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार यांनी दिली.
स्वामी चरण फिल्म्स, एम एन तातुसकर फिल्म्स प्रॉडक्शन, हर्ष जोशी प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे आहे. २०२४ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अशोक समर्थ, किरण गायकवाड, सोमनाथ अवघडे उत्कर्ष शिंदे, गणेश पदमाळे, श्रीकांत गायकवाड, प्रसाद सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मयूर तातुसकर, कुशन जोशी, महेश करवंदे ( निकम), निलेश रमेश चौधरी आणि अमृता धोंगडे निर्माते आहेत. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.