Deepika Padukone - Ranveer Singh Marriage : दीपिका पदुकोणला तिचे वैयक्तिक आयुष्य सर्वांसमोर उघड कार्याला आवडत नाही. म्हणूनच कदाचित तिने 82 ईस्टच्या घोषणेदरम्यान तिच्या लग्नाच्या पोस्ट देखील सोशल मीडियावरून काढून टाकल्या. तिचा नवरा रणवीर सिंगसोबत ती कधीतरी सोशल मीडिया त्यांच्या रिलेशनशिपविषयी काही बोलत नाही.
परंतु रणवीरच्या 38 व्या वाढदिवसानिमित्त देखील दीपिकाने त्याच्यासाठी कोणतीही पोस्ट केली नाही. यामुळे मात्र नेटकऱ्यांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्या दोघांमध्ये सगळं अलबेल आहे ना? असा प्रश्न त्यांना पडत आहे.
दीपिका तिच्या आयुष्यातील अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते हे सर्वांनाच माहित आहे. तिने नुकताच 'काली पीली'मधून प्रवास करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. तिच्या लास्ट पोस्टमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत आईस्क्रीम सँडविचचा फोटो तिने शेअर केला आहे. (Latest Entertainment News)
काल, म्हणजे 6 जुलैला रणवीर सिंगचा 38 वा वाढदिवस होता. करण जोहर, आलिया भट्ट आणि इतर अनेकांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर रॉकी और रानी की प्रेम कहानी निमित्त आल्याला पुन्हा नवीन रूपात भेटणाऱ्या रणवीरला शुभेच्छा दिल्या, पण त्याची पत्नी दीपिका पदुकोणने त्याच्यासाठी कोणतीही पोस्ट शेअर केली नाही.
यामुळे टकारी आणि त्यांच्या चाहते नाराज झाले आहेत आणि त्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यात दीपिकाने शेअर केलेली लास्ट पोस्ट ही देखील काळाची आहे. तिला ती पोस्ट शेअर मिळाला पण नवऱ्यासाठी पोस्ट करायला वेळ मिळाला नाही, असा प्रश्न नेटकरी करत आहेत.
एका नेटकाऱ्याने तिच्या लास्ट इंस्टाग्राम पोस्ट पहिली आणि कमेंट केली, “मी दिवसभर दीपिकाच्या इन्स्टाग्रामवर रणवीरच्या शुभेच्छा पोस्टची वाट पाहत आहे.”
दुसर्याने लिहिले, “तुझ्या नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी पोस्ट कर दीपिका.” “सगळं ठीक आहे ना? रणवीरच्या वाढदिवसाची पोस्ट नाही? आणखी एका नेटकाऱ्याने प्रश्न केला आहे. एका नेटकाऱ्याने प्रश्न केला, “पतीच्या वाढदिवशी पोस्ट नाही केली???”
विशेष म्हणजे दीपिकाच्या या पोस्टवर रणवीर सिंगने देखील कमेंट केली आहे, “ओ! ओहो!” त्यामुळे त्यांच्या नात्यात नेटकऱ्यांना वाटतो तास दुरावा नसेल. पण कामाच्या व्यापातून दीपिका हे जमलं नसेल असं वाटत आहे.
दीपिका पदुकोण प्रोजेक्ट के मध्ये दिसणार आहे. तर हृतिक रोशनसह ती फायटरमध्ये पहिल्यांस काम करणार आहे. दुसरीकडे रणवीरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.