Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; घरामध्ये आढळला मृतदेह, मनोरंजन विश्वावर शोककळा

Actress Passes Away : कोरियन मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'अ‍ॅज वन' फेम प्रसिद्ध अभिनेत्री ली मिन यांचे निधन झाले आहे. लिन यांनी मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला.
Famous Korean actress Lee Min passes away at 46
Famous Korean actress Lee Min passes away at 46 Saam Tv
Published On

Actress Passes Away : कोरियन मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'अ‍ॅज वन' फेम प्रसिद्ध अभिनेत्री ली मिन यांचे निधन झाले आहे. लिन यांनी मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला. त्या ४६ वर्षांच्या होत्या. लिन त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळल्या. सध्या पोलीस चौकशी करत आहेत. ली मिन यांच्या मीडिया एजन्सीने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

एजन्सीने निवेदन जारी केले

ली मिन यांच्या मीडिया एजन्सीने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आणि म्हटले आहे की, पोलिस या मृत्यूची चौकशी करत आहेत. परिस्थिती समजून घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे, लोकांना कोणत्याही प्रकारचे अनुमान लावू नयेत. तसेच एजन्सी देखील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न देखील करत आहे'.

Famous Korean actress Lee Min passes away at 46
Box Office Collection: 'महावतार नरसिंह' आणि 'सैयारा'मध्ये कांटे की टक्कर; जाणून घ्या 'सन ऑफ सरदार २' आणि 'धडक २'ची कमाई

चाहत्यांना धक्का

लिम मिन यांच्या अचानक निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. लिम मिन त्यांच्या पुढील गाण्यावर काम करत होत्या. फेब्रुवारीमध्ये त्यांनी त्यांच्या बँड पार्टनर क्रिस्टलसोबत 'स्टिल माय बेबी' नावाचे एक गाणे रिलीज केले आणि त्यानंतर जूनमध्ये 'हॅपी बर्थडे' हे गाणे रिलीज केले. १९७८ मध्ये जन्मलेली ली मिन ही कोरियन-अमेरिकन कलाकार होती. १९९९ मध्ये 'अ‍ॅज वन' या नावाने त्यांचा पहिला अल्बम 'डे बाय डे' रिलीज करून तिने मनोरंजन सृष्टीत पदार्पण केले.

Famous Korean actress Lee Min passes away at 46
The Trial 2: मी किती वेळा कमबॅक करू? 'द ट्रायल 2' ची घोषणा करताना का चिडली काजोल?

मैत्रिणी म्हणाली, 'ती खूप चांगली मैत्रीण होती'

कोरियाबूच्या मते, एका जवळच्या मैत्रिणीने ली मिन यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आणि म्हटले की, 'असे घडले आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, कारण इतक्या दिवसांनी त्यांना प्रमोशन करण्यात खूप आनंद होत होता. ती एक खूप चांगली मैत्रीण होती'. ली मिन यांनी अनेक टीव्ही शोमध्ये पाहुण्या कलाकारांची भूमिका देखील केली आणि काही चित्रपटांमध्ये काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com