Famous Director Death: हॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथा लेखक रे टिंटोरी (Ray Tintori) यांचे वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपट आणि संगीत क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. रे यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक म्युझिक व्हिडीओ, लघुपट आणि चित्रपटांचे दिग्दर्शन केले. रे टिंटोरी 'कोर्ट १३' या फिल्म कलेक्टिव्हचे संस्थापक सदस्यही होते.
निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही
टीएमझेड (TMZ) या वृत्तसंस्थेने रे टिंटोरी यांच्या निधनाची बातमी दिली आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. न्यूयॉर्क शहरातील वैद्यकीय परीक्षक कार्यालयाकडून त्यांच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. दरम्यान, त्यांची गर्लफ्रेंड आणि 'सॅटरडे नाईट लाइव्ह'ची एक्स मेंबर हायडी गार्डनरने अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हायडी गार्डनरसोबत होते रिलेशनशिपमध्ये
रे टिंटोरी आणि हायडी गार्डनर गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळ एकमेकांना डेट करत होते. दोघांनीही सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. गेल्या वर्षी रे यांनी हायडीसोबतचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंसोबत त्यांनी हायडीचे कौतुकही केले होते. हायडी ही चंद्रापेक्षाही सुंदर असून, मला भेटलेल्या सर्वात खास व्यक्तींपैकी तू एक असल्याचे त्यांनी म्हटले होते.
अनेक लोकप्रिय म्युझिक व्हिडीओंचे केले होते दिग्दर्शन
रे टिंटोरी यांना २००६ मध्ये 'डेथ टू द टिनमॅन' या लघुपटामुळे विशेष ओळख मिळाली. या लघुपटाला सनडान्स पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी अनेक लघुपट आणि चित्रपटांवर काम केले. 'कोर्ट १३' या फिल्म कलेक्टिव्हचाही ते भाग होते. या टिमने 'बीस्ट्स ऑफ द सदर्न वाइल्ड' या प्रसिद्ध चित्रपटाच्या निर्मितीत महत्वाचे योगदान दिले होते. रे यांनी संगीत क्षेत्रातही चांगले काम केले होते. त्यांनी MGMT या प्रसिद्ध बँडच्या 'किड्स', 'इलेक्ट्रिक फील', 'टाइम टू प्रिटेंड' आणि 'डान्सिंग इन बॅबिलॉन' या गाण्यांच्या म्युझिक व्हिडीओंवर काम केले होते. याशिवाय द किलर्स, आर्केड फायर आणि सोलांज यांसारख्या कलाकारांसोबतही त्यांनी काम केले होते. तसेच, टिमोथी शॅलमेटच्या 'मार्टी सुप्रीम' या चित्रपटावरही त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.