Singer Passes Away: प्रसिद्ध गायक काळाच्या पडद्याआड; कार अपघातात निधन, वयाच्या ५१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Famous Singer Died: ग्रॅमी पुरस्कार विजेते आणि हेवी मेटल बँड मास्टोडॉनचे गायक-गिटार वादक ब्रेंट हिंड्स यांचे अटलांटा येथे मोटारसायकल अपघातात निधन झाले. त्यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले.
Famous American singer guitarist Brent Hinds passed away at age of 51 in road accident
Famous American singer guitarist Brent Hinds passed away at age of 51 in road accident Saam Tv
Published On

Famous Singer Died: ब्रेंट हिंड्स हे अमेरिकन संगीत जगतातील एक प्रसिद्ध नाव होते. हेवी मेटल बँड मास्टोडॉनचा एक्स गायक-गिटारवादक आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता ब्रेंट हिंड्स यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाल्याने सर्वांना धक्का बसला. गायकाचा मृत्यू एका अपघातात झाला, याची माहिती त्यांच्या बँड सदस्यांनी दिली. या घटनेमुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

त्यांचा मृत्यू कसा झाला?

ब्रेंट हिंड्स यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या बँडने दिली. तथापि, अटलांटा पोलिसांच्या मते, बुधवारी रात्री उशिरा बाईक चालवत असताना गायकाचा मृत्यू एका कारसोबत धडकल्याने झाला. चालकाने रस्त्यावर वळण घेतल्याने ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेंट हिंड्स जागीच बेशुद्ध पडले होते.

Famous American singer guitarist Brent Hinds passed away at age of 51 in road accident
War 2 Vs Coolie: गुरुवारी 'कुली'ने मारली बाजी; 'वॉर २'ने केली २०० कोटी कल्बमध्ये एन्ट्री, जाणून घ्या कलेक्शन

बँडने शोक व्यक्त केला

ही दुःखद घटना समोर येताच, दिवंगत ब्रेंट हिंड्स यांच्या बँडने सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. ते म्हणाले, 'आम्ही खूप दुःखी आणि धक्क्यात आहोत आणि अजूनही या कलाकाराच्या जाण्याचे दुःख विसरण्याचा प्रयत्न करत आहोत.' ज्याच्यासोबत आपण इतके सुंदर संगीत आणि यश मिळवले लोकांच्या हृदयाला स्पर्श केला त्याच्या जाण्याने खूप दुख झालं आहे.

Famous American singer guitarist Brent Hinds passed away at age of 51 in road accident
Bin Lagnachi Goshta: प्रेम, नातं आणि थोडीशी नोकझोक; 'बिन लग्नाची गोष्ट'मध्ये उलगडणार उमेश-प्रियाची क्यूट लव्हस्टोरी

ब्रेंट हिंड्स कोण होता?

ब्रेंट हिंड्सचा जन्म १६ जानेवारी १९७४ रोजी अमेरिकेतील हेलेना येथे झाला. विल्यम ब्रेंट हिंड्स हा एक अमेरिकन संगीतकार होता, जो अटलांटा हेवी मेटल बँड मास्टोडॉनचा लीड गिटारवादक म्हणून ओळखला जातो. मास्टोडॉनचे दोन अल्बम खूप प्रसिद्ध झाले, त्यापैकी एक २०१७ मधील "एम्परर ऑफ सँड" आणि दुसरा २०१४ मध्ये आलेला "वन्स मोअर राउंड द सन" आहे. तसेच ब्रेंटने मार्च २०२५ मध्ये बँड सोडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com