Esha Deol: ईशा देओलने अमृता रावला कानाखाली का मारली? अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने केला खुलासा

Esha Deol VS Amrita Rao: बॉलिवूडमध्ये कलाकारांमधील मतभेद आणि वाद काही नवीन नाहीत, पण २००५ मध्ये 'प्यारे मोहन' चित्रपटाच्या सेटवर घडलेली घटना विशेष लक्षवेधी ठरली.
Esha Deol VS Amrita Rao:
Esha Deol VS Amrita Rao:Saam Tv
Published On

Esha Deol VS Amrita Rao: बॉलिवूडमध्ये कलाकारांमधील मतभेद आणि वाद काही नवीन नाहीत, पण २००५ मध्ये 'प्यारे मोहन' चित्रपटाच्या सेटवर घडलेली घटना विशेष लक्षवेधी ठरली. त्यावेळी अभिनेत्री ईशा देओल आणि अमृता राव यांच्यातील वाद इतका वाढला की, ईशाने अमृताला कानाखाली मारली. या घटनेबद्दल ईशा देओलने नंतर दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, तिला या कृतीबद्दल कोणताही पश्चाताप नाही.​

ईशा देओलने एका मुलाखतीत सांगितले की, शूटिंगनंतरच्या एका दिवशी अमृता रावने दिग्दर्शक इंद्र कुमार आणि कॅमेरामनच्या समोर तिला अपशब्द वापरले. ईशाने म्हटले, "माझ्या आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी, त्या क्षणी मी तिला कानाखाली मारली. मला याबद्दल कोणताही पश्चाताप नाही." ​

Esha Deol VS Amrita Rao:
Director Arrested: एक्साइज विभागाची मध्यरात्री रेड, २ दिग्दर्शकांना अटक, चित्रपटसृष्टीत खळबळ

या घटनेनंतर, अमृता रावने आपली चूक लक्षात घेऊन ईशाची माफी मागितली आणि ईशाने तिला माफ केले. ईशाने सांगितले, "आता आमच्यात सर्व काही ठीक आहे." ​ईशा देओलने स्पष्ट केले की, ती एका सुसंस्कृत कुटुंबातून आली आहे आणि अशा प्रकारची कृती तिच्या स्वभावात नाही, परंतु जर कोणी तिच्या आत्मसन्मानावर आघात करत असेल, तर ती स्वतःसाठी स्टॅन्ड घेऊ शकते.

Esha Deol VS Amrita Rao:
Raid 2: 48 कोटींच्या 'रेड 2' साठी अजय देवगणने घेतले बजेटचे अर्धे मानधन; तर रितेश देशमुखला मिळाले इतकेच कोटी रुपये

ईशा देओल आणि अमृता राव यांच्यातील हा वाद आता इतिहासजमा झाला असला तरी, तो आजही चर्चेचा विषय ठरतो. असे अनेक प्रकार आहेत. त्यावरून बॉलीवूडमधील भांडणाचे आणि वादाचे उदाहरण समोर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com