PS2 Day 5 Collection: चित्रपटाची जगभरात यशस्वी घोडदौड; केवळ आठवडाभरात केला 'इतक्या' कोटींचा टप्पा पार

मणिरत्नम दिग्दर्शित 'पोन्नियन सेल्वन 2' (Ponniyin Selvan-2) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Ponniyin Selvan-2
Ponniyin Selvan-2Saam Tv

PS2 Day 5 Box Office Collection: मणिरत्नम दिग्दर्शित 'पोन्नियन सेल्वन 2' (Ponniyin Selvan-2) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाने चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला. 'पोन्नियन सेल्वन 2' या चित्रपटाने सलमानच्या 'किसी की भाई किसी की जान' या चित्रपटाला टक्कर दिली असली तरी सध्या या चित्रपटाची चर्चा सुरू आहे.

Ponniyin Selvan-2
TDM Director's Big Decision: ‘टीडीएम’च्या दिग्दर्शकांचा महत्वपुर्ण निर्णय; ‘माफ करा ‘टीडीएम’ प्रदर्शन थांबवतोय!’...

मणिरत्नम दिग्दर्शित, 'पोन्नियन सेल्वन 2' (Ponniyin Selvan-2) हा चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतो आहे. चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय नंदिनीच्या भूमिकेत दिसते आहे. विशेष म्हणजे पीएस-१ प्रमाणेच 'पोन्नियन सेल्वन 2' लाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

Ponniyin Selvan 2 4th Day Box Office Collection
Ponniyin Selvan 2 4th Day Box Office CollectionInstagram @aishwaryaraibachchan_arb

चित्रपटाने कलेक्शनच्या बाबतीत सलमान खानच्या 'किसी का भाई, किसी की जान' चित्रपटाला मागे टाकले आहे. मात्र, मंगळवारी 'पोन्नियन सेल्वन 2' च्या कलेक्शनमध्ये मोठी घट झाली. तमिळ भाषेतल्या या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घट झाली आहे. (Bollywood Film)

Ponniyin Selvan-2
Aai Kuthe Kay Karte: टीआरपीमध्ये अव्वल ठरलेल्या मालिकेत येणार प्रेमाचा नवा ट्वीस्ट; ‘ते’ तीन शब्द ऐकून आशुतोष झाला लाजून चुर

'पोन्नियन सेल्वन 2' ची सुरूवात बॉक्स ऑफिसवर चांगली झाली, ऐश्वर्या राय आणि चियान विक्रम स्टारर अभिनीत या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येच सुमारे ७ ते ८ कोटींची कमाई केली.२८ एप्रिल २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चौथ्या दिवशीच भारतातील इतर भाषांमध्ये १०० कोटींचा टप्पा पार केला.

मात्र मंगळवारी या चित्रपटांवर प्रेक्षकांनी पाठ फिरवली. 'पोन्नियन सेल्वन 2' या चित्रपटाच्या इतर दिवसांच्या तुलनेत २ टक्क्याने मोठी घट झाली आहे. सोमवारी या चित्रपटाने १८ ते १९ कोटींची कमाई केली, तर दुसरीकडे मंगळवारी हा चित्रपट केवळ ८.६७ टक्के कमाई करू शकला. (Bollywood Actor)

Ponniyin Selvan-2
Salman Khan Instagram Post: जवळच्या व्यक्तीच्या निधनानं सलमान खानला झालं दु:ख, इन्स्टावर केली भावुक पोस्ट

'पोन्नियन सेल्वन 2' इतर भाषांमध्येही आपली जादू दाखवत आहे. चित्रपटाला तमिळ भाषेत भरभरून प्रेम मिळत आहे. चित्रपटाने आतापर्यंत तमिळ भाषेत एकूण ८९.०५ कोटीचा गल्ला केला, तर हिंदी भाषेत चित्रपटाने एका दिवसात १.१२ कोटीची कमाई केली. सलमान खानच्या किसी की भाई किसी की जान या चित्रपटाला मागे टाकत हा विक्रम केला आहे.

हिंदीत या चित्रपटाची एकूण कमाई १०.२२ कोटी आहे. तेलगूमध्ये चित्रपटाने १.०५ कोटींसह एकूण १०.१५ कोटी आणि मल्याळममध्ये एकूण ५.५५ कोटीची कमाई केली आहे. चित्रपटाने भारतातच ११५.१४ कोटींची कमाई केली आहे, तर जगभरात आतापर्यत २१५ कोटींची कमाई करत नवा विक्रम केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com